बारामतीतील सूर्यनगरी, गणेश मार्केटचा आठवडे बाजार बंद


बारामतीतील सूर्यनगरी, गणेश मार्केटचा आठवडे बाजार बंद

गुरुवार व रविवारी बाजार भरविण्यास नगरपरिषदेची बंदी; उल्लंघन केल्यास साहित्य जप्त करून कायदेशीर कारवाईचा इशारा

बारामती, दि. १८ : बारामती नगरपरिषद कार्यक्षेत्रातील सूर्यनगरी व गणेश मार्केट येथे दर गुरुवारी व रविवारी भरणारा आठवडे बाजार बंद करण्यात आला आहे. याबाबत बारामती नगरपरिषदेने नागरिक, विक्रेते, व्यापारी आणि शेतकऱ्यांना सूचना केली आहे.

बारामती नगरपरिषदेच्या दि. १२ जून २०२६ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेतील विषय क्रमांक ४, ठराव क्रमांक ६२ अन्वये सूर्यनगरी व गणेश मार्केटमधील आठवडे बाजारावर बंदी घालण्यात आली आहे.

Advertisemen

नगरपरिषदेच्या सूचनेनुसार, यापुढे गुरुवार व रविवारी भरणाऱ्या आठवडे बाजारात कोणत्याही प्रकारचे विक्रेते, व्यापारी अथवा शेतकऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दरम्यान, बंदी असतानाही बाजार भरविण्याचा अथवा व्यवसाय करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधितांचे व्यवसायाचे साहित्य जप्त करण्यात येईल, तसेच संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाई प्रस्तावित केली जाईल, असा स्पष्ट इशारा नगरपरिषदेने दिला आहे.

त्यामुळे नागरिक, विक्रेते, व्यापारी व शेतकऱ्यांनी या निर्णयाची नोंद घेऊन नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »