मेहता मेडीकेअर हॉस्पिटल च्या १७ व्यां वर्धापन दिनानिमित्त प्रभाग नुसार मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन
बारामती – आजकालच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांना आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे झाले आहे त्यात वयोमानानुसार व चुकीच्या जीवन शैलीमुळे बळावणारे आजार जसेकी हृदविकार,मधुमेह ,गुडघेदुखी, कंबरदुखी,मणक्याचे विकार आणि स्त्रिया संदर्भातील आजार,मुत्रविकार ,मूळव्याध या व्याधींचा मोठ्या प्रमाणावर समावेश असतो. आपल्या नित्य व्रतस्थ जीवनात आपले स्वतःच्या आरोग्याकडे नकळत दुर्लक्ष होत असते .आपल्या बारामती शहरातील सर्व नागरिकांना सामाजिक बांधिलकी म्हणून वैद्यकीय क्षेत्राकडून काही हातभार लावावा असा ” मेहता,मेडीकेअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा” मानस आहे.
याच अनुषंगाने मेहता, मेडीकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल ने आपल्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त एकाच छताखाली बारामती शहरातील सर्व नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी आणि तज्ञ कन्सल्टंट यांचे मार्फत मोफत मार्गदर्शन हा उपक्रम हाती घेतला आहे त्या माध्यमातून शहरातील सर्व 19 प्रभागा मध्ये एका पाठोपाठ एक असे दर बुधवारी सकाळी १० ते २ या वेळेमध्ये मोफत मार्गदर्शन व उपचार शिबिर घेण्यात येणार आहे, या शिबिरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजना व मुख्यमंत्री सहायता निधीतून मेहता मेडीकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचारांचा लाभ देखील रुग्णांना मिळणार आहे.
या तपासणी शिबिरा अंतर्गत खालील सर्व महत्वाच्या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत. प्रत्येक रुग्णाचे ब्लड प्रेशर, वजन ,उंची ,रक्तातील साखरेचे प्रमाण, हृदयासाठी ई.सी.जी., शरीरातील ऑक्सिजन ची पातळी.
तसेच प्रख्यात स्त्री विकार तज्ञ डॉ. विशाल मेहता, निष्णात फिजिशियन डॉ.सुनील ढाके ,अनुभवी ऑर्थोपेडीक, जॉईंट रीप्लेसमेंट अँड स्पाइन सर्जन डॉ.सौरभ तळेकर व
डॉ शैलेंद्र ठवरे ,आय.सी.यू तज्ञ डॉ दयानंद पाटील अश्या तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन मोफत असणार आहे.
या व्यतिरिक्त या आरोग्य तपासणी शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांना गुडघा व खुबा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया फक्त ७० हजार मध्ये , मणक्यांच्या शस्त्रक्रिया फक्त ७० हजार मध्ये ,मूळव्याध ,फिशर लेसर शात्रक्रिया ५० टक्के सवलतीच्या दरात, मूतखडा आणि कॅन्सर शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत करण्यात येणार असून तज्ञ डॉक्टरांनी सुचविल्यास एक्स रे , सोनोग्राफी, 2 डी एको, स्ट्रेस टेस्ट, शिबिरा नंतरचे पहिले तीन मार्गदर्शन आणि तपासणी नंतर डॉक्टरांनी सुचविल्या प्रमाणे कराव्या लागणाऱ्या सर्व शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात करण्याची सुविधा देण्यात येईल.
सर्वसामान्य जनतेच्या आरोग्य रक्षणासाठी सदैव समाजभान बाळगणारी एक सजग आरोग्य संस्था म्हणून “मेहता,मेडीकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल” ची ही वाटचाल सुरू आहे.
या संधीचा पुरेपूर फायदा बारामती शहरातील सर्व नागरिकांनी घेऊन आपले आरोग्य तपासणी करून घ्यावी असे आवाहन
मेहता,मेडीकेअर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉ विशाल मेहता यांनी केले आहे.