बारामतीत गौण खनिज माफियांना महसूल खात्याचे अभय!
बारामती : मौजे सावळ तालुका बारामती येथे बेकायदा मुरूम उत्खनन चालू असून याबाबत प्रत्यक्ष पाहणी केली असता हजारो ब्रास मुरुमाची वाहतूक झाल्याचे निदर्शनास आले. प्रत्यक्ष बेकायदा वाहतूक चालल्याचे प्रथम दर्शनी दिसले. याबाबत मा. उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, मा.तहसीलदार गणेश शिंदे, मंडलाधिकारी श्री.राजेंद्र गिरमे, गावकामगार तलाठी श्री. मयूर वाघमोडे यांच्याशी फोनवरून संपर्क साधून चित्रफीत पाठवून उत्खननाची तक्रार दिली. परंतु सुट्टी असल्याची बतावणी करून कारवाईस असमर्थता दर्शविली यावरून संबंधित मुरूम चोरीला महसूल विभागाचा अर्थपूर्ण पाठिंबा असल्याचे निदर्शनास येत आहे.सदरची बेकायदेशीर वाहतूक ही वनविभागाच्या आरक्षित जमिनीतून केली जात असून वन प्राण्यांच्या वास्तव्यास देखील धोका निर्माण झाला आहे. वनविभाग देखील गौणखनिज उत्खनन आणि वाहतुकीस अप्रत्यक्ष मदत करत असून यामध्ये काही तरी काळबैर असल्याचा संशय स्थानिक लोकांनी व्यक्त केला. अशा गौणखनिजाच्या बेकायदेशीर उत्खननाचा आणि वाहतुकीचा बंदोबस्त प्रशासन करणार की नाही हाच प्रश्न प्रत्यक्ष पाहणी करताना मनात पडला आहे?
बारामतीत गौणखनिज अवैद्य उत्खनास आणि वाहतुकीस प्रशासनातील अधिकाऱ्यांची मूकसंमती? अधिकाऱ्यांची कारवाईच्या नावाखाली उडवाउडवीची उत्तरे “मी करतो मारल्यासारखं तू कर रडल्यासारखं” या विरोधात लवकरच युवा क्रांती जनकल्याण संघटनेचा आंदोलनाचा इशारा
https://youtu.be/ZKDTcgEp2po?si=5_kjl27zGXiIqQon