असुरक्षित पोलीस एक वेगळा दृष्टिकोन! पोलीस लाच का स्वीकारतात?


केंद्र व राज्य शासनाचे निमशासकीय शासकीय विभाग आहेत. प्रत्येकच विभाग खात्यामध्ये लाचखोरी चालूच असते असं नाही पण पोलीस खात्याबद्दल या लाचखोरीची चर्चा जास्त प्रमाणात होते. त्याचे कारण ही तसेच आहे या देशातील प्रत्येक राज्यात पोलिसांना संविधानाने विशेष अधिकार दिले आहेत. प्रत्येक पोलीस कार्यक्षेत्रात शांतता सुव्यवस्था व गुन्हेगारीला आळा घालण्याचे काम पोलिसांना दिले आहे. प्रत्येक खात्याचे व विभागाचे संबंध कधीतरी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पोलीस विभागाशी येतो. जनसामान्यांचं पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतर विभाग व खात्यांपेक्षा वेगळा आहे. सर्वसामान्यांचे संरक्षण कवच म्हणून पोलीस खात्याकडे पाहिले जाते. जनसामान्यांमध्ये पोलिसांबद्दल आदरयुक्त भीतीची भावना असे परंतु आजच्या काळात पोलिसांकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिवसान दिवस बदलत चालला आहे. या भावनेतून पोलिसांबद्दल असलेले सदभाव आदरभाव संपुष्टात आला असून पोलीस रक्षक की भक्षक हा मोठा प्रश्न जनसामान्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाला आहे. त्यास येथील व्यवस्था जबाबदार आहे असे म्हणले तर वावगे ठरणार नाही. राजकीय हस्तक्षेप, दोन नंबर वाल्यांचा हस्तक्षेप, स्वयंघोषित राजकीय दलाल, सामाजिक दलाल, पोलिसांचा खबरी यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हस्तक्षेपामुळे पोलीस विभाग बदनाम होत आहे.

Advertisemen

काल परवा बारामती ग्रामीण मधील महिला पोलीस कर्मचाऱ्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने वीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. ज्या गुन्ह्यात सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे अटकच करता येत नाही अशा गुन्ह्यांमध्ये अटक करण्याची भीती दाखवून ती टाळण्याचे आमिष दाखवून वीस हजार रुपयाची लाच स्वीकारताना त्यांना अटक करण्यात आलं आहे. सदर महिला कर्मचारी दोन-चार महिन्यात पुन्हा अर्ध्या पगारावर कामावर घेतली जाईल. बिगर कमाईच्या ठिकाणी त्यांची बदली ही केली जाईल. दोन-चार वर्षांनी न्यायालयाचा निकाल ही लागेल सदर कर्मचाऱ्याला निर्दोष सोडले तर त्याच्या सेवाकाळातील उर्वरित पगार त्यांना सरकारला देणे लागते आणि तो त्यांना मिळणारच महाराष्ट्रात लाचलुचपत विभागामार्फत दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये शिक्षेचे प्रमाण अत्यल्प आहे. याची जाणीव सर्व खात्यातील विभागातील कर्मचाऱ्यांना निश्चित असते हे आपणास सांगण्याचे कारण असे आहे की पोलीस कर्मचाऱ्यांना पगार कमी आहे शासकीय सुविधा कमी आहेत खात्याअंतर्गत संरक्षण कमी आहे की खात्याची प्रतिष्ठा कमी आहे म्हणून की काय स्वतःला रक्षक म्हणवणारे पोलीस यंत्रणा सर्वसामान्य जनतेचे शोषण करते. या शोषणाचे कारण काय हे शोधत असताना न्यायालयाचा दोष आहे की लाचलुचपत कायदा कलम कमकुवत आहे की सरकारी वकील सदर गुन्ह्यांमध्ये फिर्यादीची बाजू मांडण्यास कमी पडतात का तक्रारदार तडजोड करतात की तपासी अधिकारी या गुन्ह्यांचा तपास योग्य रीतीने करत नाहीत. असे अनेक कारण संशोधनाअंती समोर आली आहेत. या सदराचे लिखाण करताना पोलिसांमध्ये असुरक्षिततेची भावना का निर्माण झाली आहे. तर कर्तव्या व्यतिरिक्त अतिरिक्त काम केल्यामुळे येथील समाज मनामध्ये पोलिसांबद्दल प्रेम जिव्हाळा आपलेपणा नष्ट झाले असून पोलिसांच्या कायद्या व्यतिरिक्त कामामुळे पोलिसांमध्ये स्वतःच्या दुष्कृत्यामुळे रात्रीची झोप व मानसिक स्वास्थ्य बिघडले आहे. प्रत्येक नागरिकाकडे गुन्हेगार म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन निर्माण झालेला आहे. फिर्यादी मधील तक्रारी मधील सत्यता पडताळून पाहण्याची मानसिक कौशल्य संपुष्टात आली आहे. पोलीस स्वतःला असुरक्षित मानू लागले आहेत. कौटुंबिक फिर्यादीमध्ये स्वतः सुप्रीम कोर्टाने गुन्हे दाखल करताना व गुन्ह्याचा तपास करताना भारतीय कुटुंब व्यवस्था नाहीशी होणार नाही जनसामान्यांच्यात कुटुंब व्यवस्थेबद्दल अनास्था माजू नये असे निरीक्षण नोंदवले आहे. आज काल पोटगीच्या दाव्यामध्येही महिलेने पोटगी मागण्यापेक्षा स्वातंत्र काबाडकष्ट करून उपजीविका जगावी असे निरीक्षण नोंदवले आहे. एखाद्या गुन्ह्यात एखादा व्यक्ती नाहक फिर्यादीने नाव गुंतवले तर त्यास पोलीस यंत्रणा किती संरक्षण देते निर्दोष व्यक्तीच्या बाजूने उभा राहते हा प्रश्न पोलीस प्रशासनाने स्वतःच्या मनाला विचारला पाहिजे. निर्दोष व्यक्ती जेव्हा संकटात असतो तेव्हा त्याला मदत करण्यापेक्षा त्याचे शोषण करणे ही विचारधारा व मनोवृत्ती बदलल्याशिवाय मानसिक शांतता मिळणार नाही व मानसिक आरोग्य बिघडल्या पोलीस विभागाला कर्म सिद्धांताप्रमाणे कुकर्माची फळे याच जन्मात भोगावे लागतील. कोट्यावधी रुपये कुमार्गाने कमवून मानसिक शांतता विकत घेता येणार नाही याची जाणीव ज्या दिवशी पोलीस नावाच्या माणसाला होईल तेव्हा त्याची कार्यक्षमता ही वाढेल व कौटुंबिक स्वास्थ्य ही मिळेल. अन्यथा माणूस म्हणून जगताना विकत घेणाऱ्या गोष्टी साधन म्हणून मिळतील परंतु नैसर्गिक गोष्टींपासून जन्मभर अलिप्त राहावे लागेल. प्रत्येक मनुष्य प्राणी ही दुःख मुक्त जीवन जगण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करतो पण सुखाच्या कर्माने दुःखमुक्त जीवन जगून दुसऱ्याला दोष देत राहतो. ही असुरक्षितेची भावना भय भीती मनात निर्माण करते व मानसिक आरोग्य आणि मानसिक स्वास्थ्य हिरावून घेते..

क्रमशः


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »