झोपलेला मतदार बारामतीचा घात करणार!


बारामती नगरपरिषदेच्या निवडणूक रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. रणसिंग फुकून निवडणूक आयोगाने ढोल नगारे बडवून युद्धास आरंभ केले आहे. पण बहिऱ्या आंधळ्या मुक्या लंगड्या सैनिकांना या युद्धभूमीत ना शंखनाद ऐकू येतंय ना ढोल नगाऱ्याचे आवाज ऐकू येत आहेत. लंगड्या मुक्याचं तर प्रश्नच उरत नाही. या निवडणुकीच्या युद्ध जन्य परिस्थितीत रुपयेच काम करणार या दृढ निश्चयामुळे येथील सरसेनापतींची चाकरी करणे हाच एकमेव सुखाचा मार्ग असल्याचे सर्वच योध्यांनी सरसेनापतीच्या घरी नोकराचे काम स्वीकारले आहे. नपुसक मनोवृत्तीने बारामतीकरांचा लढण्याची वृत्ती संपुष्टात आणली असून हक्क आणि अधिकारांच्या लढाईमध्ये वैश्यगिरीचा धंदा चालू केला आहे. गलोगल्ली भडवेगिरी करण्याची संख्या वाढत असून मतदारांना विकत घेण्याचे इसार पावत्या चालू आहेत. उद्याच्या मतदानाच्या दिवशी इसार पावती झालेल्या मतदारांचा भाव वाढू नये म्हणून दलालांनी आपली मतदार निश्चित करण्याचे आदेश सरसेनापतींनी दिले आहेत. इथल्या भूखे कंगाल निवारा शून्य मतदारांना विकत घेण्यासाठी दलालांनी साखळी निर्माण केली आहे. सगळ्यात मोठा दलाल नोकर गुलाम यालाच राजाराणी तिकीट देणार व तोच बारामती नगरपरिषदेचा मुका बहिरा आंधळा लंगडा बारामतीचे भविष्य ठरविणार बारामती मध्ये अशा विक्रावू आदर्श शून्य वैश्यगिरी करणाऱ्या मताची विक्री व खरेदी करणाऱ्या वैश्यवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी राजा राणीच्या आदेशावर सरसेनापती सेनापती यांचं कार्यक्षेत्र विभाजन कामाचे विभाजन करून राजाराणी बारामतीच्या विकासाच्या मोठमोठ्या आदर्शव्रत घोषणा करत फिरत आहेत. पन्नास वर्षाची एक हाती सत्ता बारामतीत असताना बारामतीकरांच्या मूलभूत प्रश्न आजही सुटलेले नाहीत. याबद्दल निवृत्तीच्या वाटेवर असलेले जेष्ठ राजे त्यांच्या राजकन्या व विद्यमान राजा राणी यांना बारामतीकरांनी मूलभूत हक्क आणि अधिकाराबद्दल प्रश्न विचारणे गुन्हा आहे.

Advertisemen

पन्नास वर्षांपूर्वीची बारामती दगडाने नटवली असली तरी एचआयव्ही लागण असलेल्या बारामतीच्या विकासाबद्दल रोगाबद्दल बारामतीकरांनी तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करायचा. बारामतीकरांच्या शैक्षणिक विकासाबद्दल कोणीही बोलायचे नाही बारामतीतील शैक्षणिक संस्था हे व्यापार केंद्र असून नफेखोरी विरुद्ध कसलीही तक्रार नाही. नासक्या इडाळलेला कुजलेला दुर्गंधीत शैक्षणिक माल बारामतीकारांनी सड्या भावानी विकतच घ्यायचा या विरुद्ध दाद मागायची नाही. अशा झोपेचे सोंग घेतलेल्या बारामती नगरपरिषद हद्दीतील मतदारांनी स्वतःला आपल्या आया बहिणींना लेकरा बाळांना मतपेटीत विकून स्वतःचा सत्यानाश करून घ्यायचे ठरवले आहे. प्रभाग रचनेत झालेला प्रचंड गोंधळ मतदारांची पळवा पळवी ही नित्याची बाब असून बारामतीकरांच्या अंगवळणी पडलेले आहे. नशेतील मतदारांना स्वप्नाची नशा चढवून प्रशंसेचे बक्षीस वाटत राजाराणी सुखात राज्य करत आहेत. मतदार हा राजा असतो याचा विसर पडल्याने मतं दिली म्हणजे मालक झाला काय असा सवाल करणाऱ्या राजाला मतदारांची भीती नाही. त्यामुळे यावेळेस बारामती नगरपरिषद निवडणूक, निवडणूक नसून एक विनोदी चेष्टा मस्करीचा एक अंकी प्रयोग आहे. झोपलेल्या मतदारांनो आता मटणाचे डल्याबोट्याचे लिकर खांब्याचे कॉटरचे बिर्याणी सुख्याचे स्वप्न पाहायला सुरू करा व पाच वर्षासाठी आपली वैचारिक नसबंदी करून हक्क आणि अधिकारांना मसन वाट्यात जाळा व मतदानाच्या तेराव्या दिवशी भव्य अशी प्रेत विजय यात्रा काढून आपले नाकर्तेपण नपुसकत्व सिद्ध केल्याचा जयघोष मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियाला टांगा म्हणजे एक हाती सत्ता विकासाचा विजय या पोकळ गप्पा चालू होतील. बारामतीच्या मतदारांनो तुम्हाला परग्रहा वरून एखादा परजीवी येऊन समजवेल अशी अपेक्षा भारतातील तेतीस कोटी देव आल्ला जीजस क्राईस्ट बुद्ध समजवू शकणार नाहीत धन्यवाद..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »