आंधळं दळतय अन कुत्र पीठ खातय; बारामती पंचायत समितीचा कारभार!
बारामती : येथील बारामती पंचायत समितीतील अधिकारी श्री. चांदगुडे आर.व्ही. हे नशेत काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. सविस्तर हकीकत अशी की सामाजिक कार्यकर्ते मा.रविंद्र (पप्पू )सोनवणे यांनी श्री धवडे ग्रामविकास अधिकारी मुढाळे ग्राम पंचायत कार्यालय, बारामती यांच्याकडे माहिती अधिकार अधिनियम 2005 अन्वये दि. 1/3/2024 रोजी माहिती मागितली होती. सदर माहिती देता येत नसल्याचे लेखी पत्र कायदा न जुमननारे ग्रामविकास अधिकाऱ्याने दिले. या निर्णयाविरोधात प्रथम अपील बारामती पंचायत समिती कार्यालयातील विस्तार अधिकारी तथा प्रथम आपलीय अधिकारी श्री चांदगुडे आर.व्ही.यांच्याकडे करण्यात आले. सदरील अपिलाची सुनावणी रविवार दि.14/4/2024 रोजी सुट्टीच्या दिवशी ठेवण्यात आली आहे. सदर दिवस हा भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्मदिवस असून या दिवशी केंद्र आणि राज्य शासनाची जाहीर सुट्टी असते. त्यातच रविवारचा दिवस आहे .असे असतानाही या दिवशी सुनावणी ठेवलेली आहे. घटनाकारांच्या घटनेवर चालणारे राज्य असताना बारामती मध्ये मात्र घटनेची पायमल्ली होत आहे. गटविकास अधिकारी यांच्या कानावर ही गोष्ट घातली असता हे काम माझं नव्हे अशा प्रकारचे उर्मट उत्तर दिले. प्रशासनावरची पकड ढिल्ली झाल्याने कर्मचारी गटविकास अधिकाऱ्यांचे ऐकत नसल्याचे निदर्शनास येत आहे. माहिती अधिकार अधिनियम 2005 कायद्याची अंमलबजावणी अशा अधिकाऱ्यांमुळे कुचकामी ठरत आहे. अनेक ग्रामपंचायतीची भ्रष्टाचारांची प्रकरणे, पंचायत समितीची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होऊ नयेत म्हणून अधिकारी व कर्मचारी यांची साखळी तयार झाल्याचे निदर्शनास येत आहे. या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)पक्षामार्फत आंदोलन करणार असल्याचे मा.रविंद्र (पप्पू) सोनवणे युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा RPI (आठवले) यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.