मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बारामती शहरात आम मुस्लिम जमात व फुल अॅण्ड फायनल ग्रुप बारामती यांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन
बारामती : पवित्र रमजान महिन्याचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे या ही वर्षी फुल अॅण्ड फायनल ग्रुप बारामती यांच्या वतीने मोठ्या दिमाखात व उत्साहपुर्ण वातावरणात पान गल्ली, गुनवडी चौक याठिकाणी इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, फलटण, अकलूज येथून मुस्लिम समाजातील ज्येष्ठ मंडळी हजर होती. यावेळी आदरणीय पवार साहेबांनी व खा. सुप्रियाताई सुळे यांनी समस्त मुस्लिम बांधवांस पवित्र रमजान महिन्याच्या व येणार्या ‘रमाजन ईद’ निमित्त शुभेच्छा दिल्या. सदरवेळी मिशन दंगा मुक्त महाराष्ट्र चे सुब्हान अली शेख सर यांनी उपस्थित नागरीकांना रोजा म्हणजे काय असतो याबाबत माहिती दिली.
इफ्तार पार्टी कार्यक्रमास मा. श्री. शरदचंद्रजी पवार साहेब, मा. खा.सौ. सुप्रियाताई सुळे, मा. महेबुबभाई शेख प्रदेश अध्यक्ष – राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्रजी पवार, श्री. राजेंद्र दादा पवार – चेअरमन बारामती अॅग्रो लि. पिंपळी, श्री. युगेंद्र दादा पवार खजिनदार – विद्या प्रतिष्ठान, बारामती, शेख सुब्हान अली सर, मा. श्री. सदाशिव बापूजी सातव, मा. श्री. जवाहरशेठ वाघोलीकर, मा. श्री. सुभाष आप्पा ढोले, मा. श्री. सोहेल भाई खान, मा. श्री. संदिपशेठ गुजर, मा. श्री. सत्यव्रत (सोनू) काळे, मा. श्री. अस्लम तांबोळी, प्रदिप मामा जगदाळे, पप्पु भाई शेख तसेच बारामती मुस्लिम समाजातील ज्येष्ठ मंडळी उपस्थित होते.
इफ्तार पार्टी कार्यक्रमाचे आयोजन फुल अँड फायनल ग्रुप व आम मुस्लिम जमात बारामती यांचे वतीने करण्यात आले असून ग्रुपच्या सर्व सदस्यांनी कार्यक्रम यशस्वी होणेकरीता विशेष परिश्रम घेतले.