बारामती नगरपरिषद मध्ये तक्रारींचा कचरा


बारामती – बारामती नगर परिषद हद्दीमध्ये कुठलीही समस्या नसल्याचे आमच्या वार्ताहरांना नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी स्पष्ट सांगितले आहे तोंडी तक्रार केली तर लेखी द्या म्हणतात लेखी तक्रार दिली की आवक-जावक कडे द्या म्हणतात आवक जावक कडून सदरची तक्रार विभाग प्रमुख कडे जायला तीन दिवस लागतात विभाग प्रमुखाच्या शेऱ्याला आठ दिवस लागतात चौकशी कर्मचारी नेमायला आठ दिवस लागतात चौकशी अहवाल तयार व्हायला महिना लागतो प्रत्यक्ष पाहणे अहवाल सादरच केला जात नाही ऑफिसमध्ये बसून अहवाल लिहिला जातो सदर अहवालावर कारवाई करण्याचे आदेश होण्यासाठी सदरचे प्रकरण मुख्याधिकाऱ्यांकडे जाते मुख्य अधिकारी बैठकांमध्ये व व्हीआयपी व्यक्ती समवेत जातात कार्यालयीन कर्मचाऱ्यांच्या बैठकीमध्ये तीन चार तास मुख्याधिकाऱ्याचे जातात अशा आठवड्यातून किमान दोन बैठका होतात विकास कामे पाहणी साठी किती वेळ जाईल सांगता येत नाही विशेष ठेकेदारांच्या बिलांसाठी किमान दिवसाला तीन तास कधी कधी नागरिक समस्यांसाठी दोन-चार मिनिटं अशा भरगच्च कामामुळे संबंधित तक्रारीवर कारवाई आदेश घेण्यासाठी किमान सहा महिने जातात त्यामुळे यावर्षी तुंबलेलं गटार व दुरुस्ती पुढच्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सादर होतो विकास कामाबद्दल कोणी काही बोलू नये याबाबत सर्व निर्णय नटराज आणि सुझुकी घेते टक्केवारी मलिदा याबाबत वेळ राखून ठेवलेला आहे त्यामुळे बारामतीतील तमाम नागरिकांना कर दात्यांना मतदारांना सामाजिक कार्यकर्त्यांना वरिष्ठानकडून सप्त ताकीद वजा आदेश आहे की तक्रारी अर्ज मागणी अर्ज करू नये परिणामी बारामती नगरपरिषद ही तक्रार शून्य नगरपरिषद म्हणून जागतिक वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विना तक्रार नगरपरिषद म्हणून घोषित करण्यात आली आहे या बक्षीस वितरण समारंभात सूर्यग्रहाचे पंतप्रधान बारामती मध्ये शारदा प्रांगण मध्ये उपस्थित राहून बारामतीच्या आजी-माजी व्हीआयपींची अभिनंदन करणार आहेत या कार्यक्रमास बारामतीचे सर्व नगरपालिकेच्या लाभार्थ्यांची उपस्थिती राहावी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »