मटका मालक गणेश धोत्रे अटक व सुटका
बारामती : बारामती तालुक्यातील जळोची गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या कल्याण मटका नावाच्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई बारामती उपमुख्यालय बऱ्हाणपूर पोलिसांनी केली असून फिर्याद दिली आहे. त्यानुसार, हमिद बाबासाहेब कोरबु (वय ५०, रा. लासुर्णी, ता. इंदापूर, जि. पुणे) आणि गणेश धोत्रे (रा. तांदुळवाडी, बारामती, जि. पुणे) यांच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हमिद बाबासाहेब कोरबु हा गणेश धोत्रे याच्या सांगण्यावरून कल्याण मटका नावाचा जुगार चालवत होता. ६,२१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार शिंदे करत आहेत.
ही कारवाई अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयाने केलेली केल्याने बारामती शहर व ग्रामीण पोलीस यंत्रणा काय करत आहे असा प्रश्न बारामतीतील नागरिकांना पडलेला आहे ज्या कार्यक्षेत्रामध्ये दोन नंबरचे धंदे सापडतील तिथल्या प्रभारी अधिकाऱ्याला समज पाठवून याबाबत विचारणा केली जाण्याची शक्यता आहे ज्या ज्या पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रामध्ये दोन नंबरचे धंदे आढळतील अशा पोलीस प्रभारी ची चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री व गृहमंत्री महाराष्ट्र राज्य यांनी दिल्याचे समजते या कारवाईची बारामतीकर आतुरतेने वाट पाहत आहेत.

