बेवारस व्यक्तीचा मृतदेह आढळला, ओळख पटवण्यासाठी आवाहन
यवत, २६ जुलै २०२५: दिनांक २३/७/२०२५ रोजी जालिंदर परिसरात एक बेवारस इसम मृतावस्थेत आढळून आला आहे. अंदाजे ४५ वर्षांच्या या व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, हा इसम शेती रा.पाटेठाण म्हैसकरवस्ती ता.दौंड जि.पुणे येथील असून, गेली २ वर्षांपासून तो रोडवर अनोळखी अंदाजे ४५ वर्षांचा व्यक्ती फिरताना दिसत होता. काही प्रमाणात तो बहिरा असल्याचंही बोललं जात आहे. त्याने हातवारे करून काम मागितले होते. तो गाय व म्हैशींची देखभाल करीत होता व तो सुखाने राहत होता. त्याला कोणीही नातेवाईक नसल्याचे सांगितले जात आहे.
२३/७/२०२५ रोजी पाटेठाण म्हैसकरवस्ती येथे या अनोळखी पुरुषाला चक्कर आली आणि तो बेशुद्ध पडला. त्याला यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मृतदेहाचे शवविच्छेदन यवत ग्रामीण रुग्णालयात मा.वैद्यकीय अधिकारी सो.यवत ग्रामीण रुग्णालय यांनी केले आहे.
मृतदेहाचे वर्णन: मृताचे वय अंदाजे ४५ वर्षे असून, त्याचे नाव आणि पत्ता माहित नाही. तो बहिरा होता. डोक्याचे केस काळे पांढरे बारीक आहेत, चेहरा उभट, दाढी वाढलेली काळी-पांढरी आहे. उजव्या पायाचे गुडघ्याखाली जुने जखमेचे व्रण आहेत. त्याने ग्रे रंगाचा फुल बाह्याचा शर्ट आणि निळे रंगाची नाईट पॅन्ट असे कपडे परिधान केले आहेत.
या बेवारस व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.
मृताची ओळख पटल्यास खालील नंबरला संपर्क करावा:
तपासी अंमलदार पो.हवा.शेंडगे , यवत पोलीस स्टेशन
संपर्क मोबा. नं. ९५६१९२०७७


