संजय गांधी निराधार अनुदान योजनचे ११८ अर्ज मंजूर


बारामती, दि ३०: तहसीलदार गणेश शिंदे याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संजय गांधी निराधार अनुदान योजनचे ११८, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना ५२ आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजना २ असे एकूण १७२ अर्ज मंजूर करण्यात आले आहे.

Advertisemen

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवीन प्रशासकीय भवन येथे लाभार्थी निवड बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार सुवर्णा ढवळे, अव्वल कारकून व महसूल सहाय्यक आदी उपस्थित होते.

यावेळी तालुक्यातील नागरिकांनाकडून प्राप्त झालेल्या एकूण १७२ अर्जाची छाननी करुन ते मंजूर करण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »