बारामतीकरांनो लक्ष द्या! नीरा डावा कालव्याचा प्रवाह बंद; रविवार आणि सोमवार शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा बंद


बारामतीकरांनो लक्ष द्या! नीरा डावा कालव्याचा प्रवाह बंद; रविवार आणि सोमवार शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा बंद

बारामती नगरपरिषदेचे प्रसिद्धीपत्रक जारी; पाण्याचा साठा जपून वापरण्याचे नागरिकांना आवाहन

बारामती | प्रतिनिधी

नीरा डावा कालव्यामधील पाण्याचा प्रवाह बंद झाल्याने आणि उपलब्ध पाणीसाठा मर्यादित असल्यामुळे बारामती नगरपरिषदेकडून शहरातील विविध भागांतील पाणीपुरवठा एक दिवस बंद ठेवण्यात येणार आहे. याबाबत बारामती नगरपरिषदेने १५ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे.

प्रसिद्धीपत्रकानुसार, रविवार, १८ ऑक्टोबर २०२६ रोजी बारामती शहर, रुई आणि बारामती ग्रामीण भागातील अनेक परिसरांत पाणीपुरवठा होणार नाही. त्यानंतर संबंधित भागांत एक दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे नगरपरिषदेने स्पष्ट केले आहे.

रविवारी या भागांतील पाणीपुरवठा राहणार बंद

रविवारी म्हाडा कॉलनी, मुजावर वाडा, देवळे इस्टेट, पानमळा, समतानगर, आमराई, सिद्धार्थनगर, विठ्ठलनगर, सहासनगर, चंद्रमणीनगर, वडार सोसायटी, कोरेकर हाऊस, सद्गुरुनगर, एस.टी. स्टँड परिसर, सातवाजीनगर, जवाहरनगर, पोस्ट रोड, हरिपाठ चौक, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, सिनेमारोड, विजयनगर, साईगणेशनगर, आकिलपेट सोसायटी, अशोकनगर, आनंदनगर, मयुरेश्वर अपार्टमेंट, भिगवण रोड, वसंतनगर, अवधूतनगर, व्हील कॉलनी, तपोवन कॉलनी, विवेकानंदनगर, ख्रिश्चन कॉलनी, महादेव मळा, सद्गुरुनगर, पंतगशाहनगर, मेढदरोड, क्षत्रियनगर, श्रावण गल्ली, कोठी गल्ली, तांदुळवाडी वेस चौक, सिद्धेश्वर गल्ली, मारवाड, महावीर पथ, कुरुंड गल्ली, नेवसे रोड, सुभाष चौक, कसबा गल्ली, कचेरी रोड, ब्यायजी नगर, गावठाण, साईनगर, ग्रीन पार्क आणि संपूर्ण रुई भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Advertisemen

सोमवारी या भागांतही पाणीपुरवठा बंद

सोमवार, १९ ऑक्टोबर २०२६ रोजी संपूर्ण कसबा फलटण रोड, रेणुकानगर, मुल्ला वस्ती, शिक्षक सोसायटी, लक्ष्मीनारायणनगर, माळेगाव रोड, हनुमाननगर, माळेगाव कॉलनी, सातव वस्ती, शिवाजी नगर, जामदार रोड, कारभारी नगर, सावता माळीनगर, श्रीरामनगर, चांदणी चौक, पंचशील नगर, साठेनगर, जगताप मळा, जुना मोरगाव रोड, खंडोबानगर, नवीन मोरगाव रोड, ब्यायजी नगर, गावठाण, साईनगर, ग्रीन पार्क आणि संपूर्ण रुई भागात पाणीपुरवठा होणार नाही.

नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

नीरा डावा कालव्यामधील पाण्याचा प्रवाह पुन्हा सुरू होईपर्यंत पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी पाण्याचा पुरेसा साठा करून ठेवावा आणि उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन नगरपरिषदेने केले आहे.

बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पंकज अनिल भुसे यांनी या प्रसिद्धीपत्रकाद्वारे नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

बारामती संचार | लोकहिताचा विचार, बारामती संचार


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »