सावधान: पतंगीचे दिवस येत आहे
महाराष्ट्राच्या सण उत्सवाहा पैकी एक पतंग महोत्सव हा असून लहानग्यापासून मोठ्यापर्यंत अगदी अबालवृद्ध पंचमीच्या दिवशी लहान मोठ्या पतंगे उडवण्याची परंपरा महाराष्ट्र मध्ये आहे पूर्वी भल्या मोठ्या वावड्या उडवल्या जात दोरखंड सुतळीने अशा बावड्या उडवल्या जात वावडीच्या उंचीवरून आनंद उत्सव व हारजीत ठरायची कालांतराने पतंगी ची सुरुवात झाली यातूनच पतंगी कापाकापीची स्पर्धा सुरू झाली आणि पतंग कापण्यासाठी लागणारा दोरा जितका तेज धारदार व कठीण असा पतंगबाज इतरांचे पतंग काटू लागला गेले आठ-दहा वर्ष या सणाला महोत्सवाला विकृतीचे स्वरूप आले असून धारदार न तुटणारा चायनीज मांजा आपल्या परिसरात वापरला जाऊ लागला या तीक्ष्ण धारदार मांजाने अनेकांचे जीव गेले अपंगत्व आले दृष्टी गेले अशा चुकीच्या पद्धतीने महाराष्ट्र सरकारने बंदी घातली असून यावर कारवाई करणे चे अधिकार पोलिसांना दिले आहेत पोलीस आपले कर्तव्य बजावतील परंतु नागरिक म्हणून पालक म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही समाजाने ही जबाबदारी ओळखून आपल्या पाल्याला हा पतंग महोत्सव साजरा करताना स्वतःला इजा होऊ नये आणि दुसऱ्याला इजा होऊ नये कुठलीही मोठी दुर्घटना घडू नये यासाठी या चायनीज मांजा पासून दूर राहण्यासाठी त्याच्या पाल्याचे प्रबोधन केले पाहिजे व चायनीज मांजा पासून आपल्या पाल्याला दूर ठेवणे पाहिजे तसेच अशा पद्धतीने बंदी असलेला मांजा जर कोणी विकत असेल व वापरत असेल तर 112 या पोलीस मदत केंद्रावर तात्काळ फोन करून हे विक्री व वापरणे थांबवले पाहिजे सणाच्या दिवशी आनंद उत्सव साजरा केला पाहिजे आणि या उत्साहात जर एखादी दुर्घटना घडली मांजामुळे आपल्या नातेवाईकाला किंवा पाल्याला गंभीर इजा झाली तर उत्साहाच्या आनंदात विरजण पडून सदर उत्साह दुःखात रूपांतर होईल तरी या पंचमीला खुशाल पतंग उडवा सुरक्षित उडवा आरोग्यदायी उडवा गोडदोड पंचपकवान खाऊन सर्व समाजात आनंदाने साजरी करा ही विनंती
संपादक
मोईन बागवान

