बारामतीत सर्व धर्मीयांच्या वतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद व शहीद टिपू सुलतान (र.अ.) यांची जयंती 20 नोव्हेंबर रोजी जल्लोषात साजरी ..
बारामती : बारामतीत सर्व धर्मीयांच्या वतीने स्वतंत्र भारत देशाचे प्रथम शिक्षणमंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद व मिसाईल मॅन शहिद हजरत टिपु सुलतान (र.अ.) यांची संयुक्त जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोहोत्सव समिती बारामती यांच्या वतीने हजरत टिपु सुलतान जयंती निमित्त फोटोला पुष्प अर्पन करुन मानवंदना देण्यात आली , तसेच बारामती शहरात व तालुक्यात विविध ठिकाणी हजरत टिपु सुलतान जयंती मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. बारामती शहरामध्ये मुस्लिम समाजाच्या वतीने भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत ढोल ताशा पथक , बँड बाजा पथक , प्रतिमेसाठी पुष्पगुच्छाने सजवलेला रथ आणि डॉल्बी सिस्टीम D.J चा समावेश करण्यात आला होता.
मिरवणुकीमध्ये हजारोंच्या संख्येने तरुण युवा वर्ग सामील झाला होते व सर्व जाती धर्माचे लोक सहभागी झाले होते. मिरवणूक झाल्यानंतर स्नेहभोजनाचे नियोजन करण्यात आले होते. जयंती महोत्सवाचा कार्यक्रम अतिशय खेळीमेळीने व आनंदोत्सवाने पार पडला.