दुष्काळात तेरावा महिना, भाकड जनावर विकली जाईना!
महाराष्ट्रात दररोज आठ शेतकरी आत्महत्या करत आहेत आत्महत्या का व कशासाठी केली जाते यावर अनेक शोध समित्या नियुक्ती केल्या संशोधन झाले अहवाल आले अनियमित पर्जन्यमान वृक्षतोड नैसर्गिक पाणी स्त्रोत बंद झाले नैसर्गिक पाणी वाहून जाणारी यंत्रणा बंद झाली जमिनीचे तुकडे पडले अल्पभूधारक शेतकऱ्यांची संख्या वाढली जमिनीचा पोत गेला अति रासायनिक खतांमुळे जमिनी नापीक झाल्या यालाच एक पर्याय म्हणून सरकारने शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाला प्रोत्साहन दिले व गाव खेड्यात घरोघरी देशी विदेशी गायांची संख्या वाढली इतर दुभत्या जनावरांपेक्षा गाई जास्त दूध देत असून शेतकऱ्यांच्या प्रपंचाला आधार मिळू लागला तसतसं गाईची संख्या वाढली दूध संकलनाचे केंद्र वाढले परंतु पुढे सरकारने गोवंश व गोमाता यांच्या कतलींवर बंदी आणून महाराष्ट्रातून गोमाता व गोवंश हत्या प्रतिबंधित कायदा अंमलबजावणी सुरू झाली त्यामुळे भाकड जनावरांची संख्या गोठ्यांमध्ये वाढू लागली व शेतकऱ्यांवर आर्थिक व श्रमिक ताण पडू लागले परिणामी गोवंश व गोमातेला स्थलांतराला व वाहतुकीची परवानगी नसल्याने गोमाता व गोवंश मूळ मालकाच्या घरी अन्न पाण्या वाचून मरू लागले अशा एका मृत जनावराला विल्हेवावाटेसाठी शेतकऱ्याला किमान चार ते पाच हजार रुपये खर्च येऊ लागला अशा दुहेरी संकटात शेतकरी टिचला जाऊ लागला
नव्याने एक वेगळीच अडचण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसमोर उभे राहिले आहे भाकड म्हशी व भाकड परवानगी युक्त जनावरे खरेदी न करण्याचा निर्णय या जनावराचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांनी केला आहे बाजार समितीतून किंवा वैयक्तिक जनावरे खरेदी केली जात नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे कर्जाचा बोजा वाढत चाललेला असून जनावरांच्या माध्यमातून मिळणारी तुटपुंजी मिळकत सुद्धा आता बंद झाली आहे त्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना उपासमारीची वेळ आली आहे दुधाच्या भावाच्या संकटाने शेतकऱ्यांची आर्थिक कंबर मोडले असताना सरकार याबाबत मृत जनावरांची व भाकड जनावरांची व्यवस्था लावण्यासाठी तयार नाहीत किंवा जबाबदारी स्वीकारण्यास तयार नाहीत दुसऱ्या बाजूने भाकड जनावरांवर व भाकड म्हशी यांची खरेदी विक्री बंद झाल्याने शेतकऱ्यांसमोर गंभीर समस्या निर्माण झाली आहे
गावोगावी मेळावे घेऊन जनावरे खरेदी-विक्री बंद करावी असे आवाहन खरेदी-विक्री करणारे व्यापारी यांनी केले आहे व्यापाऱ्यांच्या समस्या साठी एक शिष्टमंडळ पशुसंवर्धन मंत्रालयाला भेटले असून बाकापेच प्रसंग निर्मूलनाचे आश्वासन मंत्री महोदयाने दिला आहे