माळेगाव बुद्रुक सट्याचा खांदेपालट


माळेगाव – बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक हे कारखान्याचे गाव असून यामध्ये नगरपंचायतीचे कार्यालय सुरू झाले आहे शैक्षणिक व कारखानदारीमुळे हे गाव बारामती च्या राजकारणामध्ये अग्रगण्य असते आत्ताच माळेगाव साखर कारखान्याची निवडणूक झाली असून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढली गेली व एक हाती जिंकली गेली निवडणुकीच्या धामधुमीत माळेगाव पोलीस कार्यालयाने एक धाडसी निर्णय घेऊन जुन्या सट्टेवाल्याला हाकलून देऊन नवीन सट्टेमालकाला व्यवसायस अभय दिले आहे बारामती तालुक्यात एक स्थानिक सट्टेवाल्याची कमतरता भासल्याने फलटण वरून खान नामक सट्टेवाला बाजारात सन्मानपूर्वक वाजवत गाजवत माळेगाव बुद्रुक मध्ये व्यवसायास प्रोत्साहन दिले आहे जुन्या मालकाची व एजंटची नाराजी दूर करून जुन्या मालकाला वेगळी मंथली द्यायची ठरली असून जुन्या मालकांचे सर्व देणे घेणे आणि खानसाहेबांनी पूर्ण केले आहे एजंट वर असलेले कर्ज माफ केले असून नव्याने कर्ज देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे तर या तडजोडीसाठी परिश्रम घेतलेले कर्मचाऱ्यांना तोळ्यात पिळ्यात बक्षीस दिल्याचे समजते गावामध्ये असंतोष निर्माण होऊ नये म्हणून दोन नंबर व्यवसाया संबंधित पुढाऱ्यांना चावली पावली चा निवध देण्यात आला आहे कार्यक्षेत्रातील मोठ्या देवाला महिन्याचे चारपायी चा निवध तर सर्वसामान्याला दोन पायाच्या पाखरूडं द्यायचं ठरलं आहे सुक्की रोटी व काळीज बोकं बारामतीच्या वेशीला पोहोच केलं असून महिन्याच्या पहिल्या अमावस्येला निवध चुकणार नाही याची तंबी बारामतीच्या वेशिने दिली आहे अन्यथा बारामतीचा कोप झाला तर व्यवसाय देशोधडीला लागेल असा शाप देण्यात आलेला आहे बारामती तालुक्याचे ब्रह्मदेव मा दादा यांनी दोन नंबर केल्यास टायर मध्ये टाकण्यात येईल ही शाप मागं घेतला असून त्यांना उपशाप दिला असून वरदान पर शुभेच्छाही देण्यात आलेल्या आहेत माळेगाव कारखाना क्षेत्रातील चावली पावली नेत्यांनी केलेल्या परिश्रमाचा मोबदला म्हणून फलटणकर खान माळेगावात भरभराटेला येऊ हीच शुभेच्छा ब्रह्मदेवाने दिले आहे हाताला काम पोटाला भाकरी मिळाली पाहिजे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »