मंगेश जगताप यांना अंतरिम अटकपूर्व जामीन; एफआयआर दाखल करण्यास १४ वर्षांचा विलंब झाल्याचा बचाव पक्षाचा दावा


मंगेश जगताप यांना अंतरिम अटकपूर्व जामीन; एफआयआर दाखल करण्यास १४ वर्षांचा विलंब झाल्याचा बचाव पक्षाचा दावा

बारामती, दि. ३१ जुलै : पुणे जिल्हा परिषद सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे पदाधिकारी मंगेश जगताप यांनी त्यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या गंभीर गुन्ह्याप्रकरणी बारामती जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Advertisemen

सुनावणीदरम्यान बचाव पक्षाने न्यायालयासमोर मांडलेल्या युक्तिवादात, संबंधित प्रकरणात एफआयआर दाखल करण्यास तब्बल १४ वर्षांचा विलंब झाला असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच, उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे गुन्ह्यात नमूद करण्यात आलेली संबंधित कायदेशीर कलमे लागू होत नसल्याचा दावाही करण्यात आला.

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने पुढील सुनावणीपर्यंत मंगेश जगताप यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला. प्रकरणाची पुढील सुनावणी नियोजित तारखेला होणार असून, त्यानंतर न्यायालय अंतिम निर्णय देणार आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे बारामतीसह पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, न्यायालयीन प्रक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »