विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR): एन्युमरेशन फॉर्म भरण्याची मुदत ८ ऑगस्टपर्यंत वाढ


विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR): एन्युमरेशन फॉर्म भरण्याची मुदत ८ ऑगस्टपर्यंत वाढ

पुणे, दि. ३० : भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) कार्यक्रमांतर्गत एन्युमरेशन फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत वाढविली आहे. त्यामुळे २१४ पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील सर्व पात्र मतदारांनी आपला एन्युमरेशन फॉर्म तातडीने भरून घ्यावा, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी केले आहे.

Advertisemen

मतदारांना एन्युमरेशन फॉर्म संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) यांच्याकडे ऑफलाइन पद्धतीने किंवा ऑनलाइन पद्धतीने voters.eci.gov.in या संकेतस्थळावर भरता येणार आहे. फॉर्म भरण्याबाबत कोणतीही अडचण किंवा अधिक माहिती हवी असल्यास संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मतदारांनी दिलेल्या मुदतीत एन्युमरेशन फॉर्म भरला नाही, तर संबंधित मतदाराचे नाव प्रारूप मतदार यादीत समाविष्ट होणार नाही. त्यामुळे अंतिम मुदतीची वाट न पाहता सर्व पात्र मतदारांनी तातडीने फॉर्म भरून विशेष संक्षिप्त पुनरिक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही मतदार नोंदणी अधिकारी सिद्धार्थ भंडारे यांनी आवाहन केले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »