माळेगावात कल्याण मटका जुगारावर पोलिसांचा छापा; एकाविरुद्ध गुन्हा दाखल


माळेगावात कल्याण मटका जुगारावर पोलिसांचा छापा; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

बारामती, दि. ३१ : माळेगाव बुद्रुक हद्दीतील शिवतारा हॉटेल परिसरात सुरू असलेल्या कथित कल्याण मटका जुगारावर माळेगाव पोलिसांनी धाड टाकून एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, ३० जुलै रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता पोलिसांनी पंचांसमक्ष छापा टाकला. यावेळी सोमनाथ भाऊसो करंडे (रा. सस्तेवाडी, ९ फाटा, ता. बारामती) हा कल्याण मटका जुगार चालवित असल्याचे आढळून आले. पोलिसांची चाहूल लागताच काही जण घटनास्थळावरून पळून गेले, तर करंडे याला ताब्यात घेण्यात आले.

Advertisemen

झडतीदरम्यान आरोपीकडून ₹१,०३० रोख रक्कम तसेच मटका आकड्यांच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या. या प्रकरणी माळेगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम, १८८७ च्या कलम १२(अ) अन्वये गुन्हा क्रमांक १९०/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सादिक सलाउद्दीन सय्यद करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »