रिपाइं (आठवले) पक्षाचा शाखा उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न


नीरा : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नीरा या गावात पंकज धिवार (तालुकाध्यक्ष) आणि स्वप्निल कांबळे (तालुका युवक अध्यक्ष) यांच्या प्रयत्नातून आणि पुढाकारातून रिपाइं (आठवले) पक्षाचा शाखा उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. सदरील शाखा उद्घाटनाचा कार्यक्रम आणि कार्यकर्ता मेळावा मा.सूर्यकांत वाघमारे (अध्यक्ष प.महाराष्ट्र) मा.अशोक (बापू) गायकवाड (कार्याध्यक्ष प. महाराष्ट्र) तसेच मा.शशिकला (ताई) वाघमारे (अध्यक्षा महिला आघाडी प.महाराष्ट्र) या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित पार पडला.
यावेळी मा.रत्नप्रभा(ताई)साबळे (महिला आघाडी उपाध्यक्षा प. महाराष्ट्र) मा.विक्रम (दादा) शेलार (प्रभारी पुणे जिल्हा) मा.गणेश गायकवाड (ज्येष्ठ सरचिटणीस पुणे जिल्हा) मा.रविंद्र (पप्पू) सोनवणे (युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा) मा.गौतम भालेराव(नेते पुरंदर)आदी रिपाइं (आठवले) पक्षाचे पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. सदरील शाखा उद्घाटन आणि कार्यकर्ता मेळाव्यात स्थानिक नागरिकांचा सहभाग देखील मोठ्या प्रमाणात होता.

Advertisemen


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »