भीषण अपघातात 8 ठार, 5 जखमी: जेजुरी-मोरगाव रस्त्यावर थरार


जेजुरी: जेजुरी-मोरगाव रस्त्यावर बुधवारी (१८ जून २०२५) रात्री सव्वासात वाजण्याच्या सुमारास एका भीषण अपघातात एका महिलेसह आठ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दोन मुलांसह पाच जण गंभीर जखमी झाले. हा अपघात किर्लोस्कर कंपनीसमोर, श्रीराम हॉटेलजवळ घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, जेजुरीकडून इंदापूरकडे जाणाऱ्या एका भरधाव कारने श्रीराम हॉटेलबाहेर उभ्या असलेल्या एका पीकअप टेम्पोला जोरदार धडक दिली. पीकअपमधून साहित्य उतरवण्याचे काम सुरू असतानाच हा अपघात झाला.

Advertisemen

या अपघातात पीकअपमधून साहित्य उतरवणारे काही कामगार, हॉटेलचे मालक, कारमधील काही व्यक्ती आणि एक महिला असे एकूण आठ जण जागीच ठार झाले. जखमींमध्ये दोन लहान मुले, एक महिला आणि दोन पुरुषांचा समावेश असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अपघातातील मृतांची आणि जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. घटनेची माहिती मिळताच जेजुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तसेच मृत व्यक्तींना रुग्णालयात दाखल केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »