नाझरे धरण १००% भरण्याच्या मार्गावर, कऱ्हा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


पुणे, २४ जून २०२५ – पुरंदर तालुक्यातील नाझरे मध्यम पाटबंधारे प्रकल्पात (नाझरे धरण) आज सकाळी ६ वाजता ९८% पाणीसाठा जमा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे कऱ्हा नदीतून धरणात ४५० ते ४७५ क्यूसेक पाण्याची आवक होत आहे. ही आवक अशीच राहिल्यास येत्या ८ ते १० तासांत धरण १००% भरण्याची शक्यता आहे.
नाझरे धरणावर गोडबोले पद्धतीचे २६ स्वयंचलित दरवाजे आहेत. धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर हे स्वयंचलित दरवाजे कार्यान्वित होऊन कऱ्हा नदीत विसर्ग सुरू होईल. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
तहसीलदार, पुरंदर तालुका यांना विनंती करण्यात आली आहे की, कऱ्हा नदीच्या पात्रालगतच्या गावांचे सरपंच आणि ग्रामसेवक यांना पूर्वसूचना द्यावी. तसेच, नदीपात्रातील विद्युत पंप, पशुधन आणि इतर साहित्य सुरक्षितस्थळी हलवण्याबाबत आणि नदीपात्रात कोणीही जाऊ नये याबाबत दवंडी देऊन सूचना देण्याचे आदेश संबंधित सरपंच आणि ग्रामसेवकांना देण्यात यावेत.
धरणातून सुरू असलेल्या विसर्गाबाबत माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी शाखाधिकारी अ.आ. घोडके (मो. ९५६१०९४०८४) आणि द.का. वि.बा. पवार (मो. ९८५०६६७२१२) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Advertisemen


या माहितीची प्रत कार्यकारी अभियंता, उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, पुणे-३७, उपविभागीय अभियंता, पुरंदर उपसा सिंचन व्यवस्थापन उपविभाग, नाझरे, सहाय्यक अभियंता श्रेणी-१, बारामती पाटबंधारे उपविभाग, बारामती, उपविभागीय अधिकारी पुरंदर, सासवड, उपविभागीय अधिकारी बारामती-इंदापूर, तहसीलदार बारामती तालुका, गटविकास अधिकारी पुरंदर पंचायत समिती, सासवड, गटविकास अधिकारी बारामती पंचायत समिती, बारामती, मुख्याधिकारी बारामती नगरपरिषद, मुख्याधिकारी जेजुरी नगरपरिषद, पोलीस निरीक्षक जेजुरी पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक सुपे पोलीस स्टेशन, पोलीस निरीक्षक वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन, तसेच नाझरे (क.प.), नाझरे (सुपे), जवळार्जुन, पांडेश्वर, आंबी (बु.), आंबी (खुर्द), मोरगाव, तरडोली, बाबुर्डी, काहऱ्हाटी, माळवाडी, जळगाव (क.प.), जळगाव (सुपे), कऱ्हावागज, अंजनगाव, ब्रहाणपूर, मेडद या ग्रामपंचायतींचे सरपंच/ग्रामसेवक यांना पुढील कार्यवाहीसाठी पाठवण्यात आली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »