पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; राज्यात ८.३३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे e-KYC पूर्ण


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना; राज्यात ८.३३ लाखांहून अधिक शेतकऱ्यांचे e-KYC पूर्ण

पुणे, दि. ३१ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण (e-KYC) अभियान राज्यभर वेगाने सुरू असून, ३१ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत १६,९६,२०१ पात्र लाभार्थ्यांपैकी ८,३३,२२३ शेतकऱ्यांचे e-KYC पूर्ण झाले आहे. राज्यातील एकूण प्रगती ४९.८४ टक्के इतकी नोंदविण्यात आली आहे.

विभागनिहाय आकडेवारीनुसार कोल्हापूर विभाग ६४.२६ टक्के प्रगतीसह राज्यात आघाडीवर असून, त्यापाठोपाठ पुणे विभाग (६०.२६%), नाशिक (५४.९३%), अमरावती (५४.१५%), कोकण (४९.१५%), नागपूर (४८.४८%), लातूर (३९.७७%) आणि छत्रपती संभाजीनगर विभाग (३५.०६%) यांचा क्रमांक लागतो.

Advertisemen

जिल्हानिहाय प्रगतीमध्ये अहमदनगर (७३.४७%), भंडारा (६९.८९%), वाशीम (६७.४८%), ठाणे (६७.४२%), सांगली (६७.३४%), सातारा (६६.५८%), पुणे (६५.४४%) आणि नाशिक (६४.८६%) या जिल्ह्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

योजनेचा लाभ वेळेत मिळावा यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण (e-KYC) तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच संबंधित यंत्रणांनी प्रलंबित लाभार्थ्यांशी संपर्क साधून e-KYC प्रक्रिया लवकर पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »