बारामती तालुका पोलिसांकडून मंगळसूत्र परत; फिर्यादी महिलेने मानले पोलिसांचे आभार
बारामती तालुका पोलिसांकडून मंगळसूत्र परत; फिर्यादी महिलेने मानले पोलिसांचे आभार
बारामती, दि. १ ऑगस्ट : बारामती तालुका पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या साखळी चोरीच्या गुन्ह्यात जप्त करण्यात आलेले सुमारे १० ग्रॅम वजनाचे, अंदाजे १ लाख ४० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र फिर्यादी महिलेला कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून परत करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला २१ जुलै २०२६ रोजी रात्री कामावरून घरी जात असताना तिच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरीला गेले होते. या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान आरोपीला अटक करून त्याच्याकडून चोरीस गेलेले मंगळसूत्र जप्त करण्यात आले.
त्यानंतर न्यायालयीन व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ३१ जुलै २०२६ रोजी फिर्यादी महिलेला पोलीस ठाण्यात बोलावून मंगळसूत्र परत देण्यात आले. यावेळी फिर्यादीने बारामती तालुका पोलिसांचे आभार व्यक्त केले.
ही कारवाई पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी व मुद्देमाल शाखेतील कर्मचाऱ्यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.


