मुर्टीत पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; सहा जण ताब्यात, ४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त


मुर्टीत पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; सहा जण ताब्यात, ४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त

बारामती : तालुक्यातील मुर्टी गावात लोणी-भापकर रोडलगत पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकत सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत रोख रक्कम आणि पत्त्यांचे दोन कॅट असा एकूण ४ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील पथकाला २६ ऑगस्ट रोजी गुप्त बातमीदारामार्फत मुर्टी गावातील लोणी-भापकर रोडलगत दिलीप चव्हाण यांच्या पोल्ट्री फार्मच्या शेडजवळ काही जण पैशांवर तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली.

माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पंचांना सोबत घेत संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले असता काही इसम गोलाकार बसून जमिनीवर पैसे ठेवून हातात पत्ते घेऊन जुगार खेळताना आढळून आल्याचे FIR मध्ये नमूद आहे. त्यानंतर पोलिसांनी सुमारे सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी छापा टाकून सहा जणांना ताब्यात घेतले.

Advertisemen

ताब्यात घेतलेल्या व्यक्तींमध्ये चंद्रकांत यशवंत कुचेकर (वय ५०), रमेश सत्यवान कांबळे (वय ५४), संदीप ज्ञानबा गायकवाड (वय ४४), संपत चंद्र बालगुडे (वय ५४), दत्तात्रय पोपट गायकवाड (वय ३३) आणि सुरेश सदाशिव पवार (वय ५२) यांचा समावेश आहे. FIR नुसार यातील तिघे मोरगाव, एक मुर्टी, एक पांढरे आणि एक करंजेपूल येथील रहिवासी आहेत.

पोलिसांनी केलेल्या कारवाईत ४ हजार १५० रुपये रोख रक्कम तसेच ५२ पानी पत्त्यांचे दोन कॅट जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ४ हजार २५० रुपये असल्याचे FIR मध्ये नमूद आहे.

या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ मधील कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार दीपक शिवाजी वारुळे करीत आहेत. FIR ची नोंद पोलीस उपनिरीक्षक जीवन शांताराम मोहिते यांनी केली आहे.

दरम्यान, जुगाराविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे मुर्टी परिसरात खळबळ उडाली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »