“वनवासी” माळेगाव नगरपंचायत!


माळेगाव : आज शुक्रवार दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी वार्तांकन करण्यासाठी नव्याने निर्माण झालेल्या माळेगाव नगरपंचायत येथे भेट देण्याचा योग आला व आश्चर्याचा धक्का बसला पूर्ण कार्यालयांमध्ये दोन महिला कर्मचारी कार्यरत असल्याच्या आढळून आल्या इतर सर्व कर्मचारी गैरहजर असल्याचे निर्दशनास आले. कार्यालयाच्या परिसरातील अनेक नागरिकांशी वार्तालाप केल्यानंतर मुख्याधिकारी कार्यालयात येतच नसल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. तर अपुऱ्या कर्मचारी संचामध्ये ही अनेकांच्या बदल्या झाल्याच्या समजते. सदर नगरपंचायत नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी आहे की अडचणी वाढवण्यासाठी असा प्रश्न निर्माण होत आहे.

Advertisemen

अनेक विकास कामे रखडले असल्याचे प्रत्यक्षात लक्षात आले. सांडपाणी व्यवस्थापनाचा बोरबाजा वाजलेला आहे. अपूर्ण प्रकल्प धूळखात पडलेले आहेत. गावाच्या विकासाला चालना देण्यासाठी ग्रामपंचायतची नगरपंचायत करण्यात आली. परंतु कर्मचाऱ्यांच्या प्रामुख्याने मुख्याधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे गावाचा विकास खुंटल्याचे स्थानिक नागरिक बोलत आहेत. तर शासन निधी उपलब्ध करून देत नसून त्यामुळे विकास कामासाठी पैसे नसल्याचे एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले. कर्मचाऱ्यांना कामच नसल्यामुळे कर्मचारी कार्यालयात गैरहजर असतात. कर्मचाऱ्यांनाविना मुख्याधिकाऱ्यांविना नगरपंचायत पाहणी हा एक मनोरंजनाचा खेळ झाला आहे की काय असे चेष्टेने परिसरात चर्चा आहे. तर विनापरवाना गैरहजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी व कार्यालयात बायोमेट्रिक यंत्रणा बसवून हजेरी पत्रक तपसावे, कामवही निर्माण करून नियमित काम पूर्ततेचे अहवाल नियमित कर्मचाऱ्यांकडून लिहून घ्यावेत अशी मागणी माळेगावकर करत आहेत. याकडे जिल्हा अधिकारी लक्ष देणार का?


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »