राष्ट्रवादी युवक कॉग्रेस बारामती तालुका युवक उपाध्यक्ष पदी मा.अमीर मुलाणी यांची निवड
बारामती : राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीचे युवक प्रदेशाध्यक्ष आदरणीय श्री महेबुब शेख साहेब यांच्या मान्यतेने व श्री. प्रशांत कांतीलाल बोरकर युवक अध्यक्ष, बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या आदेशाने मा. अमीर गफुर मुलाणी यांची राष्ट्रवादी युवक कॉग्रेस बारामती तालुका युवक उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या खासदार महासंसदरत्न सौ. सुप्रिया ताई सुळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले आणि शुभेच्छा देखिल देण्यात आल्या. तसेच मुलाणी यांचे सामाजिक कार्य व संघटनात्मक कौशल्य पाहून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या वाढीसाठी आणि पक्षाचे विचार जनते पर्यंत पोहचविण्यासाठी कार्य करणार असल्याचे मुलाणी यांनी सांगितले आहे.