राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गट सावरतोय ? सत्यव्रत काळे यांची बारामती शहर युवक अध्यक्ष पदी निवड
सत्यव्रत काळे यांची बारामती शहर युवक अध्यक्ष पदी निवड
बारामती – बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया ताई सुळे यांनी पक्ष संघटनात्मकते विशेष लक्ष घालले असून राष्ट्रवादी कांग्रेस च्या विभाजनानंतर बारामतीतील दिग्गज राजकीय घराण्यातील व्यक्तीना पक्ष संघटनेत समाविष्ट करून घेण्यास सुरुवात केली आहे. शरद पवारांचे एकेकाळचे सहकारी कैलासवासी विनोद कुमार गुजर यांच्या घरण्यातून बारामती शहराला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला शहराध्यक्ष पद लाभले असून आता काळे घराण्यातील मा. नगरसेवक सत्यव्रत काळे यांना शहर युवक अध्यक्ष पदी वर्णी लागली आहे.
राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर बारामती राष्ट्रवादी काँग्रेस हे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असून शरद पवार व सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात नवीन कार्यकारणी जाहीर करावी लागली. पवार कुटुंबीयातील या दोन राष्ट्रवादी काँग्रेसच्या रस्सीखेच मध्ये सर्वसामान्य कार्यकर्ता सभ्रमित असून ज्यांना शरद पवारांकडे जायचं आहे त्यांनी खुशाल जावे असे आव्हान महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले. असे असले तरी अजित पवार यांचे बारामती लोकसभा मतदार संघातले संघटनात्मक पकड घट्ट असून ही खिंड लढविणे सुप्रिया ताई सुळे याना अवघड जाईल असे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. अजितदादांच्या संघटनात्मक रचनेला
भेदण्यासाठी सुप्रियाताई सुळे यांनी कंबर कसली असून भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपाई गटातील असंतुष्ट लोकांचे चाचपणी घेतली जात आहे. ज्या कार्यकत्याना पक्ष संघटनेकडे मानाची पदे व शासकीय पदे मिळाली नाहीत अश्या पदाधिकारीना शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गट सामावून घेत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे पुढील होऊ घातलेल्या निवडणुकीत दोन्ही पवार कुटुंबियांचे कस लागेल हे निश्चित आहे.