श्री अष्टविनायक गणेशोत्सव तरुण मित्र मंडळाच्या वतीने शालेय साहित्य,किराणा किट व साड्यांचे वाटप
बारामती – वसंतनगर बारामती येथील श्री अष्टविनायक गणेश उत्सव तरुण मित्र मंडळाच्या वतीने बारामती नगर परिषद शाळा क्रमांक ८ येथील विद्यार्थ्यांना २५ टिफीन डबे व स्कूल बॅग देण्यात आल्या.तसेच वसंतनगर मधील गरजू कुटुंब व महिलांना किराणा किट व साड्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी वसंतनगर परिसरातील ज्येष्ठ नागरिक, गुणवंत शिक्षक, सेवानिवृत्त झालेले अधिकारी/ कर्मचारी, पोलीस दलातील अधिकारी, विधीक्षेत्रात कार्य करणारे विधिज्ञ यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच विविध स्पर्धेतील विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष जयदादा पाटील, युवक अध्यक्ष अविनाश बांदल, युवा कार्यकर्ते ओंकार जाधव, महेश गायकवाड, सयाजी गायकवाड,गौरव जाधव, विजय जाधव, संजय जाधव, सुरेंद्र गायकवाड, सुनील जाधव, रवींद्र गायकवाड ,दिनकर जाधव, निलेश गायकवाड, रितेश गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेंद्र गायकवाड यांनी केले.