संपादकीय : हत्यांची मालिका एक कटुसत्य!
बारामती मोरगाव रोड महात्मा फुले चौकामध्ये भीषण अपघात झाला. बारामती हादरली याला अपघात म्हणायचा की हत्या हा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे. अपघाताचे छायाचित्रे व चित्रफीत समाज माध्यमातून तेजीने प्रसारित होत आहेत. “एक बाप मृत्यू च्या कवेत जात असताना माझ्या मुलींना वाचवा माझ्या मुलींना वाचवा” असा टा हो फोडून बघ्याना आव्हान करतो. मन मेंदू हृदय बधिर करणारा हा आक्रोश महाराष्ट्र भर प्रत्येक बापाच्या डोळ्यात पाणी आणतोय तर आयाबहिनी या अक्रोशाचा प्रतिध्वनी ऐकून आपल्या लहान लहान लेकरांना पाहून ढसाढसा रडू लागले आहेत. कंबरे खाली छिन्नविच्छिन्न रक्ताने माखलेले शरीर दोन हात आपल्या मुलीच्या पायाकडे करून मरतानाची शेवटची याचना देवा कडे करत आहे. पण निर्दयी मनुष्य आणि देव या लहानग्या ना वाचवू शकला नाही. ज्या ज्या डोळ्यांनी हे दृश्य आपल्या मोबाईल वर पाहिले तो प्रत्येक बारामतीकर हा मनापासून त्या अवजड यमासारखा दिसणारा वाहन कधी कोणाचा बळी घेईल हे सांगता येत नाही. ही दुर्दैवी वेदनादायक घटना हे भलेमोठे संकट माझ्या दारासमोर येऊन थांड बसले आहे काय? अनेकांच्या घरातील चुली बंद आहेत अन्नाचा घास गळ्याखाली उतरत नाही कित्येकांनी अन्न वर्ज केले आहे. जेव्हा जेव्हा हातामध्ये मोबाईल घेतला जाईल तेव्हा तेव्हा ते दृश्य आईवडिलांचं हृदय पिवळून टाकत आहे. हे कमी होतं का काय? म्हणून दुसऱ्या दिवशी त्या चिमुकल्या चे आजोबा आणि मृत व्यक्ती चे वडील या धसक्याने मृत पावल्याची बातमी वाऱ्यासारखी बारामतीकरांच्या कानावर धडकली व बारामती सुन्न होऊन जाते. एकाच घरातले चार व्यक्ती एका चालकाच्या चुकीमुळे मृत पावतात देवाज्ञा होते. या बारामतीतून एक कुटुंब उध्वस्त होताना पाणावलेल्या डोळ्याने बारामतीकर पाहत असतात अनुभवत असतात व बारामती मध्ये अश्याच पूर्वी झालेल्या घटनाने भीतीने अंगावर शहारे येतात. काल पर्वा बारामती इंदापूर रोड ला चुकीच्या मार्गाने जाणाऱ्या एक अवजड वाहनाने एका व्यक्तीचा खून केला हो हो खूनच केला कायद्याने नियमाने त्याला त्या मार्गाने मज्जाव आहे परवानगी नाही अश्या मार्गाने तो बिनधास्त व निर्धास्तपणे कुणाचीही भिती नसल्यासारखा भरधाव वेगाने एका जिवंत माणसाला एका क्षणार्धात खल्लास करतो व चालता बोलता माणूस मृत शरीरात रूपांतरीत होतो. पुन्हा एक कुटुंब उध्वस्त झाले. परिसरामध्ये स्मशानशांतता बारामतीकर पुन्हा आपला मोबाईल हातामध्ये घेऊन त्या मृत्यू ची बातमी खबर आपल्या मोबाईल मध्ये पुन्हा पुन्हा पाहत होता. त्रिमूर्ती नगर जळोची येथे लहानगा विद्यार्थी सायकलवर घरी जात असताना एका रस्ता निर्माण करणाऱ्या रॉलर ने त्या लहानग्याचा जीव घेतला. त्याची सायकल व तो रॉलर खाली कसा चिरडला गेला याची छायाचित्रे बारामतीकरांनी पुन्हा पुन्हा पाहायला सुरुवात केली त्या लहानग्या च्या आईवडिलांचा टाहो आजही असमंतांमध्ये घुमत आहे. व त्या लहान बाळाचा आवाज कानामध्ये एक प्रश्न विचारतोय माझा जगण्याचा अधिकार का हिसकावून घेतला मी मरण्यासारखा होतो का? असा भयान मृत्यू माझ्या वाटेला का येवा हृदयाची ठोके चुकवणारा तो बाल आवाज झोप येऊ देत नाही ओ.. हे संपत नाही तोच मोबाईल मध्ये तांदूळवाडीतील नवयुवक तरणाबाड विद्यार्थी महाकाय मुरूम वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनाने वळण घेताना या विद्यार्थ्याला धडक बसते आणि रक्ताची रांगोळी रस्त्यावर निस्पित पडून राहते. माझं बाळ शिकून सावरून मोठं होईल म्हतारपणाची काठी होईल माझ्या जगण्याची प्रेरणा आधार अशी भावना आईबापाची त्या छिन्नभिन्न झालेल्या रक्ताने भरलेल्या मृतदेह कडे पाहून एका क्षणात संपुष्टात येते . तेव्हा काळ दात इचकत त्या गर्भगळीत झालेल्या आईबापाकडे पाहून आनंद उत्सव साजरा करीत असतो आणि ओरडून सांगत असतो तुम्हाला विकास पाहिजेना विकास तेव्हा शे दोनशे बळीचा निवध्य विकासाला चढवावा लागतो विकासा साठी गोरगरीब दुचाकी वाले पायी चालणारे यांचे बळी या विकास नावाच्या देवाला वाहावेच लागतील
पूर्वी प्राचीन काळी एखादे मोठे काम करताना नरबळी ची प्रथा होती ती प्रथा आधुनिक बारामती मध्ये आजही चालू आहे फक्त बळी तुमचे दिले जात आहेत.
अश्या असंख्य अपघातांमध्ये चालकाच्या चुकीमुळे झालेल्या अपघातामध्ये मृत्यूस जबाबदार हे कलम लावले गेलेले नाहीत. प्रत्येक अपघातात वाहन चालकास न्यायालयात सहानुभूती मिळत आहे. वाहन मालकास व विकास ठेकेदाराचे नावही कधी प्रसिद्ध होत नाही. की प्रशासन कधी समोर येऊन या अपघातात तपास संबंधित एक भ्र शब्दही काढत नाहीत या बद्दल बारामतीकर अत्यंत संयमी शांत आणि सहकार खोर आहेत ही आधुनिक कुसंस्कृती बारामतीत निपजत आहे. प्रश्न विचारने हा बारामतीकरांचा मुळ स्वभाव नाही नपुंसक मनोवृत्ती ला संस्कार म्हणणारे बारामतीकर सलंतराला सुरुवात करा. बारामतीच्या विकासाला जागा कमी पडत आहे. अन्यथा विकास नावाच्या देवाला तुमच्या बळीची नितांत गरज आहे. विकासाच्या नावाखाली चाललेले विद्रुपीकरण अशास्त्रीय वेढा विकास बारामती मध्ये तुम्हाला मोकळा श्वास घेऊ देणार नाही स्वतंत्र उपभोगू देणार नाही भीतीच्या वातावरणात गुलामीच्या छायेत तुमच्या सत्तर पिढ्या येथेच जिवंत पणे नर्रक यातना भोगतील तेव्हा गुवाच्या गाड्या तुमची मुलं ओढताना तुम्हाला डोळ्याने पाहावे लागेल व त्यावेळेस होणारं दुःख तुम्ही सहन करावं ते सहन करण्याची ताकत स्वघोषित देवाने तुम्हाला देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना..
बारामतीचा नर्रक बनवणारे विद्रूप करणारे सर्वांचा पर्दाफाश उद्याच करणार आज या दुःखाच्या क्षणी हे बोलणे योग्य नसल्याने इथेच थांबतो..


