बारामती तालुका नाभिक संघटनेच्या अध्यक्षपदी रोहन शिंदे, उपाध्यक्षपदी अजित यादव यांची निवड
बारामती | बारामती तालुका नाभिक संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची नुकतीच निवड झाली आहे. यामध्ये रोहन शहाजी शिंदे यांची अध्यक्षपदी, तर अजित सुभाष यादव यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. २९ जुलै रोजी झालेल्या या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीची सुरुवात श्री संतश्रेष्ठ सेना महाराज, शूरवीर जिवाजी महाले आणि नरवीर शिवाजी काशीद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यावेळी समाजातील विविध समस्या आणि भविष्यातील योजनांवर चर्चा करण्यात आली.
कार्यकारिणीतील इतर पदाधिकाऱ्यांची नावे पुढीलप्रमाणे:
* कार्याध्यक्ष: अनंत आपुणे
* खजिनदार: शिरीष काशीद
* सचिव: आदेश संजय आपुणे
* सहसचिव: ओंकार शिंदे
याशिवाय, अमोल रवींद्र सूर्यवंशी, अभय सतीश सूर्यवंशी, नवनाथ सुरेश सूर्यवंशी, शुभम राजेंद्र माने, आकाश संजय आपुणे, शंभू किशोर शिंदे, रोनक किरण शिंदे, सुरज सुनील वारुळे, मारुती दुधाळ, संतोष काशीद, संतोष पवार, आणि सागर माने यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संतोष शिंदे (भावनगरी संपादक) यांची प्रसिद्धी प्रमुखपदी, तर ॲड. प्रकाश बबनराव जाधव यांची कायदेशीर सल्लागार म्हणून निवड झाली आहे.
मावळत्या अध्यक्षांनी नवीन कार्यकारिणीला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले, तर नवनिर्वाचित अध्यक्ष रोहन शिंदे यांनी समाजाच्या प्रगतीसाठी सक्रिय आणि पारदर्शक काम करण्याचा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चौधरी यांनी केले, तर आभार प्रदर्शन शिरीष काशीद यांनी केले. सर्वसाधारण सभेचे अध्यक्षपद सुधाकर माने यांनी भूषवले.
ही निवड शांततेच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याने सर्वांनी समाधान व्यक्त केले.


