बारामती नगरपरिषदेतील बांधकाम विभागात विजेचा अपव्यय
Advertisemen
बारामती: एकीकडे विजेचा तुटवडा असताना बारामती नगरपालिकेत विजेचा विनाकारण वापर होताना दिसत आहे. बांधकाम विभागातील अधिकारी, कर्मचारी कोणी ही त्यांच्या नेमून दिलेल्या जागेवर नसताना देखील सर्व पंखे आणि दिवे चालू राहणे हे नेहमीचेच. एका बाजुला बारामती नगर परिषदेच्या महसूल विभागाचे कर्मचारी भर उन्हात देखील शहरातील नागरिकांच्या दारोदारी फिरून घरपट्टी ,पाणीपट्टी इत्यादी कर भरवयास लावुन नगर परिषदेच्या वार्षिक उत्पन्नामध्ये कशी वाढ करता येईल यासाठी प्रयत्नशील असताना दुसऱ्या बाजूला बारामती नगर परिषदेतीलच बांधकाम विभागातील अधिकारी आणि कर्मचारी जर अशा प्रकारे विजेचा अपव्यय करीत असतील तर मुख्याधिकारी साहेब अशा बेजबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करतील हे पाहावे लागेल?