अवैध गौणखनिज धाडीमधील पोकलेन मशीन जप्त करण्यास महसूल कर्मचाऱ्यांची असमर्थता!


बारामती– बारामती येथील मौजे कटफळ, रुई व सावळ या ठिकाणी गौणखनिज माफियांच्या विरुद्ध झालेल्या धाड सत्रामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्याने रुई, सावळ व कटफळ येथील बेकायदेशीर गौणखनिज उत्खनन करताना आढळलेली पोकलेन मशीन सदर ठिकाणावरून जप्त करण्यास असमर्थता दाखविली आहे. याबाबत गौणखनिज माफियांमध्ये आनंदाचे वातावरण असून याबाबत मंत्री महोदयांच्या सचिवा बरोबर बारामती येथील गौणखनिज माफियांची बैठक झाल्याचे समजते. सदर सचिवाच्या बारामतीतील घराच्या बांधकामाच्या वेळी याच गौणखनिज माफियांनी वाळू, दगड, खडी, मुरूम फुकट टाकल्याचे सचिवासमोर बोलून दाखवले व वेळोवेळी केलेल्या सहकार्याची आठवण ही करून दिली. त्यामुळे सचिव साहेबांनी तात्काळ प्रशासनावर दबाव आणून इलेक्शन काळात अश्या कारवाया करू नयेत अशी धमकी वजा दम प्रशासनास दिला असल्याची चर्चा गौण खनिज माफियांमध्ये चालू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »