बारामती नगरपरिषद कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस प्रतीक्षा
कंत्राटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार का?
बारामती : शहरात विविध कार्यालयांत ठेकेदार पद्धतीने कंत्राटी कर्मचारी काम करत आहेत. त्यांना कामगार कायद्याप्रमाणे वेतनही निश्चित केले आहे. मात्र, त्यांना दिवाळीनिमित्त निश्चित केलेला बोनस मिळत नसल्याची चर्चा कंत्राटी कर्मचाऱ्यांन मध्ये होत आहे.
काही दिवसांपूर्वी बारामती नगरपरिषदेने माझी वसुंधरा 4.0 मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामध्ये या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे ठेकेदारा मार्फत बक्षीस स्वरूप बोनस वाटप करतील का? याकडे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून असल्याचे समजते.
‘कर्मचारी अल्पशिक्षित किंवा निरक्षर असल्यामुळे त्यांना बोनसच्या रकमेबाबत निश्चित माहिती नाही.
कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये; तर काही कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये, अशा पद्धतीने बोनस दिला जातो. गोरगरीब कर्मचारी आपल्याला कामावरून काढू नयेत, या भीतीने वर्षभर काम करतो. त्यांना दिवाळी बोनसची अपेक्षा असते. पण, ठेकेदार मनमानी करत आहेत.
कर्मचाऱ्यांना किमान वेतनाप्रमाणे बोनस दिला जात नाही. ठेकेदारावर करारनाम्याच्या नियमाप्रमाणे लक्ष दिले तर नक्कीच गोरगरीब सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक अशा सारख्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळेल व त्यांचे कुटुंब आनंदाने दिवाळी साजरी करतील.