बारामती मध्ये रोजगार निर्मितीसाठी मोठमोठ्या कंपन्या आणन्याचा प्रयत्न करणार – युगेंद्र पवार


बारामती : बारामती मधील नामांकित योद्धा प्रोडक्शन अँड पब्लिसिटी या प्रोडक्शन हाऊसच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त श्री निलेश काळे बिजनेस कोच पुणे यांचे व्यवसायातील सिस्टीम व प्रोसेस या विषयावर मार्गदर्शन व उद्योजक मित्रांचा मेळावा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सदर कार्यक्रम रविवार दि 18 ऑगस्ट 2024 रोजी ज्येष्ठ नागरिक संघ येथे पार पडला. या कार्यक्रमास विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार, युवा नेते युगेंद्र दादा पवार हे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. यावेळी बोलत असताना युगेंद्र पवार म्हणाले की योद्धा प्रोडक्शन हाऊसने फक्त आठ वर्षात महाराष्ट्रभर पोहोचून कमी कालावधीत जी दैदीप्यमान कामगिरी केली आहे याचा मला व बारामतीकरांना सार्थ अभिमान आहे. उद्योजकांना एकत्र करून अशा प्रकारे मार्गदर्शन मेळावे घेणे हे कौतुकास्पद आहे, येत्या काळात आदरणीय मोठ्या साहेबांना सांगून बारामती मध्ये रोजगार निर्मितीसाठी मोठमोठ्या कंपन्या आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

Advertisemen

यावेळी योद्धा प्रोडक्शन हाऊस च्या वतीने योद्धा उद्योजक सन्मान 2024 देण्यात आले. यामध्ये अनुक्रमे श्री विशाल तुपे संचालक स्वप्नपूर्ती अकॅडमी, श्री सतीश खारतोडे यशवंत बिजनेस ग्रुप, श्री जमादार ऑल सोल्युशन इंटरप्राईजेस, श्री राजाराम सातपुते संचालक व्ही आर बॉयलर, श्री सुजित कदम आर्टिक इंजीनियरिंग यांना योद्धा उद्योजक या सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नानासाहेब साळवे यांनी केले तर आभार योगेश नालंदे यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बारामती बिजनेस चौक च्या संपूर्ण टीमचे मोलाचे सहकार्य लाभले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »