निवडणूक आयोगाने महाराष्ट्र व हरियाणा विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षाला ऊसधारक शेतकरी (गन्नाकिसान) निवडणूक चिन्ह बहाल केले


दिल्ली : आगामी होणाऱ्या महाराष्ट्र व हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाला निवडणूक चिन्ह दिलं आहे. निवडणूक आयोगाने महाराष्ट्र व हरियाणा विधानसभेसाठी रिपब्लिकन पक्षाला ऊसधारक शेतकरी (गन्नाकिसान) निवडणूक चिन्ह बहाल केले आहे. रिपाई चे सर्व उमेदवार ऊसधारक शेतकरी (गन्नाकिसान) या चिन्हावर निवडणूक लढवतील. हे चिन्ह निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Advertisemen

रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे प्रदेश सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे यांनी महाराष्ट्रातील जिल्हा अध्यक्ष जिल्हावार पदाधिकारी राज्य कार्यकारिणी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व आघाड्या यांना सर्व विधानसभा मतदारसंघ तयारी करावी व चिन्ह घरोघरी पोहचावे अश्या सूचना दिल्या असून लवकरच निवडणूक पुर्वतयारी रिपब्लिकन पक्षाचे विभागवार मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत
असे प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे प्रदेश सरचिटणीस गौतम भाऊ सोनवणे यांनी कळविले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »