बारामतीमध्ये होणार रामदास आठवले यांची जाहीर सभा
बारामती 22 एप्रिलः बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनित्रा पवार यांच्या प्रचारार्थ केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांची बारामतीमध्ये 25 एप्रिल 2024 रोजी जाहीर सभा होणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहराध्यक्ष अभिजीत कांबळे यांनी सांगितले. त्या अनुषंगाने पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे यांचे सूचनेनुसार आज दिनांक 22 एप्रिल रोजी बारामती शहरामध्ये पुणे जिल्हाध्यक्ष विक्रम शेलार यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. रामदास आठवले यांची बारामतीमध्ये 25 एप्रिल 2024 रोजी होणाऱ्या सभेविषयी सदरील आढावा बैठकीमध्ये सखोल चर्चा झाली.
Advertisemen
यावेळी बारामती शहराध्यक्ष अभिजीत कांबळे, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा रत्नप्रभा साबळे, पुणे जिल्हा युवक कार्याध्यक्ष रविंद्र(पप्पू) सोनवणे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष मधुकर मोरे, तालुकाध्यक्ष संजय वाघमारे, महिला तालुकाध्यक्षा सिमा चोपडे, महिला तालुका कार्याध्यक्षा पूनम घाडगे, तालुका सरचिटणीस माऊली कांबळे, महिला जिल्हा सरचिटणीस रजणी साळवे, सविता गायकवाड, प्रमोद खंडागळे, सिमा घोडपडे, आण्णा लांडगे आदी आरपीआय (आठवले) पक्षाचे बारामती शहर व तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
महायुतीच्या उमेदवार सुनित्रा पवार यांच्या प्रचारानिमित्त बारामतीमध्ये होणारी रामदास आठवले यांची जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाचा बारामती शहर व तालुक्यातील प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता जोमाने तयारी करेल, असे रविंद्र(पप्पू) सोनवणे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.


