बारामतीतून अजित पवार यांचा उमेदवारी अर्ज अवैध
बारामती – बारामती विधानसभा मतदार संघात ४६ उमेदवारांनी त्यांचे नामनिर्देशन पत्र सादर केले होते. त्या पैकी चार उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र हे अवैध ठरले असून त्यात सनय छत्रपती शासन पक्ष ,भारतीय नवजवान पक्ष व दोन अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे.
या बाबतची माहिती अशी की, बारामती विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रांची दि. ३० ऑक्टोबर रोजी छाननी झाली. बारामती-२०१ मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, बहुजन समाज पार्टी (आंबेडकर), वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रीय समाज पक्ष, समता पार्टी, बहुजन समाज पार्टी, संभाजी ब्रिगेड पार्टी यांच्यासह एकूण ४६ उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र सादर केले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे उमेदवार अजित पवार, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युगेंद्र पवार, वंचितचे मंगलदास निकाळजे तर अपक्ष म्हणून अभिजित कांबळे हे प्रमुख उमेदवार आहेत. त्या ४६ उमेदवारांपैकी सनय छत्रपती शासन पक्षाचे अजित प्रदिप पवार ,भारतीय नवजवान पक्षाचे बाळासो धापटे, अपक्ष उमेदवार दिलीप नाळे व विनोद चांदगुडे या चार उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र हे झालेल्या छाननीत अवैध ठरले आहेत.
अजित प्रदिप पवार यांचे नामनिर्देशन पत्र अवैध झालेचे कारण
१. उमेदवारांने नामनिर्देशन पत्रातील नमुना नं ३ अ भरलेला नाही. तसेच त्यावर स्वाक्षरी केलेली नाही.
२. नमुना २६ मधील विहीत नमुन्यातील प्रतिज्ञापत्र सादर केले नाही त्यामुळे त्यांना सुधारीत प्रतिज्ञापत्र सादर करणे बाबत Checklist द्वारे कळवुनही विहीत मुदतीत त्यांनी सुधारीत प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. मुदतीत केलेली नाही.
३. उमेदवाराने त्यांचे नाव ज्या मतदारसंघाच्या मतदार यादीमध्ये आहे त्याची प्रमाणित प्रत जोडलेली नाही.
🙏….पुरंदर बातम्या चालतील का.सर..
बापू आंबीकर. रायकर. पञकार. पुरंदर..