बारामतीमध्ये महात्मा बसवेश्वर जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक; राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पाणीवाटप


बारामती: जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त बारामती शहरात समाजबांधवांच्या वतीने भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत मोठ्या संख्येने समाजबांधव सहभागी झाले होते. मिरवणुकीत सहभागी झालेल्या समाजबांधवांसाठी बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार यांच्या वतीने पक्ष कार्यालय भिगवण चौक येथे पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले.

Advertisemen

यावेळी बारामती तालुका अध्यक्ष ॲड. एस. एन. बापू जगताप, बारामती शहर अध्यक्ष ॲड. संदीप गुजर, बारामती शहर युवक अध्यक्ष सत्यव्रत काळे, निलेश भाई कोठारी, बारामती शहर उपाध्यक्ष सतीश सोनवणे, बारामती शहर सेवादल अध्यक्ष शरद धुमाळ, ओंकार राऊत, चेतन वाडेकर, बापू आगम, शोएब बागवान, सागर हिंगमिरे, संजय भंडलकर, संदीप भोई, अमोल करंजे, इंद्रभान लव्हे, नाना घाडगे, अन्वर खान यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »