बेलगाम बारामती नगरपरिषद!


बारामती : महाराष्ट्रातील विकसित आदर्श नमुना म्हणून सुप्रसिद्धीला पावलेली बारामती नगरपरिषद हा एक मोठा गैरसमज महाराष्ट्रभर पसरवण्यात आला आहे. बारामती नगर परिषद बारामतीकरांना मूलभूत सुविधा देणारी एक संस्था नसून बारामतीकरांना पीडा देणारी समस्या देणारी एक यंत्रणा आहे. ज्याच्यावर कोणाचाही लगाम नसल्याचे निष्पन्न होत आहे. बारामती नगर परिषदेला ना कायद्याचे अंकुश आहे ना न्यायालयाचे “इथे हम करे सो कायदा आणि हम करे सो काम” दूरदृष्टी व समन्वयाच्या अभावामुळे बारामती नगर परिषद ग्रासलेली आहे. प्रत्येक विभागामध्ये अंधाधुंद कारभार एका विभागाचा दुसऱ्या विभागामध्ये हस्तक्षेप धनिक श्रीमंत ठेकेदार यांची बटिका असलेली नगरपरिषद बारामती टिचभर पावसाने तुंबून जाते. पाण्याच्या निचऱ्याची व्यवस्था असावी ही साधी बाब तज्ञ नगरपरिषदेला कळत नाही. सल्लागारांच्या तिजोऱ्या भरणारी बारामती नगरपरिषद मोठ्या मोठ्या इमारतींना वाहनतळ असले पाहिजे ज्यामुळे बारामतीतील वाहतूक सुरक्षित आणि सुरळीत होईल एवढं साधं पुरेसं ज्ञान बांधकाम विभागाला नाहीये. वृक्ष गणना हा कायदा असताना वायू पर्यावरण पूरक वातावरण निर्माण केले पाहिजे एवढी साधी गोष्ट उद्यान विभागाला नाहीये. बेकायदा वृक्षतोड हा गुन्हा आहे या कायद्याची अंमलबजावणी बारामतीकरांच्या आरोग्येशी निगडित आहे याची जाणीव उद्यान विभागाला नाहीये.

अतिक्रमण विभागाचा तर कारभार रस्त्यावरच आहे. त्याबद्दल बोलणे किंवा लिहिणे लाज आणण्यासारखे आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून बारामतीतील इमारतीचे सर्वेक्षण झाले पण अजूनही किती इमारतींनी, घरांनी, उद्योग भावनांनी शासनाचे नियम पाळले आहे व बांधकाम केले आहे याचा अहवाल प्रसिद्ध झाला नाही. टक्केवारीच्या दुनियेत पोटभरो सल्लागाराच्या सांगण्यावरून ठेकेदारांची बिल काढणारी बारामती नगरपरिषद, योग्यता व अयोग्यता न तपासणारी बारामती नगर परिषद अजूनही बारामती नगरपरिषदेने आपलं पूर्ण कामकाज संगणकीकृत केलेले नाही. शेकड्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणाऱ्या नगर परिषदेकडे किती कॅमेरे चालू आहे, किती कॅमेऱ्यांचे रेकॉर्डिंग होत आहे याची कल्पना नाही, संगणक कक्ष नाही, सीसीटीव्ही कॅमेरेवर लक्ष ठेवणारी यंत्रणा उभी नाही, तक्रार निवारण केंद्र नाही, कित्येक महिने तक्रारी संबंधित विभागाकडे वर्ग केले जात नाही, लोक अभिमुख कार्यक्रम नावाची गोष्ट असते याची पुसटशी कल्पना बारामती नगर परिषदेला नाही, ऐन पावसाळ्यात उन्हाळ्यात बारामतीकरांना नियमित स्वच्छ व पिण्याजोगे पाणी मिळत नाही. आरोग्य विभागाचा ठणठण गोपाळा आरोग्य विभाग नेमकं काय करतोय हे येथील रोगराईग्रस्त जनतेला अजिबात माहिती नाही, पावसाळ्यात साथीचे रोग पसरू नये म्हणून कुठल्या उपाययोजना करव्यात याची जाणीव नाही, झोपडपट्ट्यांमध्ये सखल भागांमध्ये पावसाचे पाणी शिरू नये म्हणून वर्षानुवर्ष नगर परिषदेने कुठल्याही उपाययोजना केल्या नाहीत.

Advertisemen

बारामती नगर परिषदेने नैसर्गिक पाणी निचरा यंत्रणा संपुष्टात आणलेली आहे. ओढे, नाले, नदी यांच्यावर अतिक्रमण करून सर्वसामान्य बारामतीकारांच्या जीवाशी बारामती नगरपरिषद खेळत आहे. अशा नगरपरिषदेला येथे कृत्रिम विकासाला विकास म्हणतात. दगड धोंड्याने सिमेंट रेतीने देखण्या दिसणाऱ्या रोगित बारामतीला विकसित बारामती म्हणायची का?

बारामती नगरपरिषदेचे शैक्षणिक धोरणाचा आलेख खड्ड्यात गेल्याचे सांगायची गरज नाही. भिकारातला भिकारी गरिबातला गरीब बारामतीकर नगर परिषदेच्या शाळेत आपली मुले घालत नाहीत. का घालत नाहीत? या प्रश्नाचे उत्तर आदर्श बारामतीकरांनी शोधावे. ज्या शाळा नगरपरिषद चालवीत आहे त्या शाळेच्या इमारती, स्वच्छालये, बैठक व्यवस्था, विद्यार्थ्यांच्या आरोग्याची व सुरक्षेतेची आणि शैक्षणिक दर्जाची काळजी कोण घेत आहे? हे एकदा नगर परिषदेने जाहीर करावे. सातवीतल्या विद्यार्थ्याला बाराखडी ची ओळख नसणे हे विकसित बारामतीचे भूषण.! बारामती नगर परिषदेच्या दगडी विकासासाठी कोट्यावधी रुपये उपलब्ध होत आहेत. परंतु बारामतीकरांची मूलभूत गरज शिक्षण आरोग्य यावरती शून्य टक्के पैसे खर्च केले जातात. कामगार ठेके देऊन कमिशनचा मलिदा खाणारे प्रशासन बारामतीचा विकास केव्हा करणार पाट्या टाकणारे व वर कमाई करणारे नगरपरिषद हे कमाईचे साधन आहे असं म्हणणारे शासक प्रशासक बिंदासपणे आपले पांढरे सफेद काळे धंदे दिवसाढवळ्या राजरोसपणे करत आहेत. अशा बारामती नगर परिषदेला वर्ल्ड गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान मिळाले तर नवल समजू नये. गटारीतील किड्या मुंग्याप्रमाणे आयुष्य जगणारे बारामतीकर उद्या जागतिक पारितोषक मिळाल्यानंतर बारामतीतून भला मोठा विजय महोत्सव साजरा करून आपल्या परमपित्त्याला धन्यवाद देण्यास कमी पडणार नाहीत. समस्यांच्या डोंगरावर उभा राहून नेत्याच्या जयघोषात बारामतीचा झेंडा आकाशाला नक्कीच भिडवेल धन्य हो बारामतीकर..


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »