बारामती प्रिमियर लीग 2024 चा विजेता ठरला शिवशंभो स्मशर्स संघ


बारामती : बारामती प्रिमियर लीग 2024 पर्व 5 या टेनिस बॉल वरील क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना दि.25/2/2024 रोजी शिवशंभो स्मशर्स विरुद्ध फॉर्चुन 9291 टायगर्स या दोन संघामध्ये झाला. अंतिम सामन्याची नाणेफेक मा.महेश रोकडे साहेब साहेब(मुख्याधिकारी बा न प)यांच्या हस्ते करण्यात आली. झालेल्या अंतिम सामन्यात शिवशंभू स्माशर्स हा सचिन दातिर यांच्या मालकीचा संघ विजयी झाला तर फॉर्चून 9291 टायगर्स हा संघ उपविजेता ठरला.विजेत्या आणि उपविजेत्या संघास रोख रक्कम आणि ट्रॉफी बक्षीस म्हणून देण्यात आले.यावेळी बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाकरीता मा.जय(दादा)पाटील (बारामती शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँगेस पार्टी), मा.पिंटू (भाऊ)गायकवाड, डॉ.योगेश मुळीक,मा.घोडे(सरपंच गुनवडी) मा.खोमणे(सदस्य गुनवडी ग्रा. पं.)मा.संतोष सातव, मा.अमोल पिसाळ, मा.विजय जगदाळे, मा.अनिल विटकर, मा.उमेश शिंदे,मा.ओंकार जाधव तसेच स्पर्धेत सहभागी सर्व संघाचे संघ मालक आदी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
सदरील स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मुख्य आयोजक म्हणून मा.रविंद्र(पप्पू)सोनवणे, मा.अभिजीत कांबळे ,मा.योगेश व्हटकर तसेच मा.सूरज(पप्पू)अहिवळे यांसोबत आमराई बॉईज क्रीडा प्रतिष्ठान मधील सर्वच सहकाऱ्यांनी अपार कष्ट घेतले.
कार्यक्रमाच्या शेवटी बारामती प्रीमियर लीग स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचेच आभार आयोजकांकडून मानण्यात आले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »