निवडणूक निरीक्षक आनंधी पालानीस्वामी यांनी घेतला निवडणूक कामकाजाचा आढावा
बारामती दि.२४: बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निरीक्षक श्रीमती आनंधी पालानीस्वामी यांनी उपविभागीय कार्यालय, प्रशासकीय भवन, बारामती येथे मतदारसंघातील निवडणूकविषयक कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर, अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी गणेश शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, गटविकास अधिकारी अनिल बागल आदी उपस्थित होते.
श्रीमती पालानीस्वामी यांनी निवडणूक साहित्याचे नियोजन, मतदान केंद्राची व्यवस्था, अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती व त्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या, जाहिरात फलक, बॅलेट पेपर, पोलीस बंदोबस्त, विशेष पथकांची नेमणुकीची ठिकाणे आदींबाबत बैठकीत माहिती घेतली. श्री. नावडकर यांनी मतदारसंघातील कामकाजाबाबत निवडणूक निरीक्षक यांना माहिती दिली.