भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमच्या दर्शनी भागावरील ‘कारभारी जिमखाना’ नावाचे होल्डिंग्स तत्काळ काढण्याचे बारामती नगर परिषदेचे आदेश


बारामती: बारामती नगरपरिषदेने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमची देखभाल दुरुस्ती आणि क्रिकेट अकादमी चालवण्याचे काम ‘धो आ सातव उर्फ कारभारी अण्णा चॅरिटेबल फाउंडेशन’ला दिले आहे. मात्र, या संस्थेने स्टेडियमच्या दर्शनी भागावर’कारभारी जिमखाना’ असे नावाचे होल्डिंग्स लावल्याने याविरोधात बारामती शहरातील आंबेडकरी चळवळीतील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत सदर नावाचे होल्डिंग्स तत्काळ काढण्यात यावे अशा स्वरूपाचे लेखी निवेदन स्थानिक प्रशासनास दिले.त्याअनुषंगाने बारामती नगरपरिषदेने सबंधित संस्थेला सदर होल्डिंग्स तातडीने हटवण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच यापुढील काळात सदर स्टेडियममध्ये कोणत्याही स्वरूपाचे काम करण्यापूर्वी बारामती नगर परिषदची पूर्वपरवानगी घ्यावी अशा स्वरूपाचे लेखी आदेश धो.आ. सातव उर्फ कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशला देण्यात आले आहेत.

Advertisemen

 

याबाबत मा.रविंद्र सोनवणे- युवक कार्याध्यक्ष पुणे जिल्हा RPI (आठवले)यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी नाराजी व्यक्त करीत स्टेडियमविषयी बारामती नगर परिषदेची भूमिका ही धो.आ.सातव उर्फ कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशन,बारामतीचे चालक- मालक यांना पाठीशी घालणारी असून याठिकाणी जर अनुसूचित जाती जमातीतील अथवा गोरगरीब नागरिकांकडून अशा स्वरुवाचे कृत्य झाले असते तरी देखील बारामती नगर परिषदेची भूमिका ही केवळ नोटीस देण्यापुरतीच मर्यादीत राहिली असते का? नसेल तर मग सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण करणेबाबतचा गुन्हा धो.आ. सातव उर्फ कारभारी आण्णा चॅरिटेबल फाउंडेशनचे चालक-मालक यांच्यावर अद्याप का दाखल करण्यात आला नाही असा प्रश्न त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »