बा.न.प सार्वत्रिक निवडणुकीत आमराई आघाडीवर!


बारामती – बारामती नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 चे पडधम वाजू लागले असून आज दि. 29 ऑक्टोबर 2025 रोजी मतदार अदलाबदल खदलाबदल मयताला जिवंत जिवंतला मयत याच्यावरची सुनवणी पार पडली. यामध्ये प्रशासनाची तारांबळ उडाल्याचे निदर्शनास आले. अनेक आमराईतील मतदार, इच्छुक नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी जातीने या सुनावणी ला हजर राहून आपल्या मताच्या हक्क आणि अधिकाराबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरत असल्याचे दिसले.

दुर्दैवाने या आक्षेपाची सुनावणी त्यांच्यासमोर चालली होती ज्यांनी या प्रभाग रचना मतदार याद्या बनवल्या व प्रसिद्ध केल्या अशा विधीतज्ञ प्रशासक संपन्न अनुभवी विद्वान अधिकाऱ्यांसमोर झाली. आपण केलेल्या चुका जेव्हा सर्वसामान्य मतदार आपल्या समोरच पुराव्यानिशी दाखवून सिद्ध करतो तेव्हा बेअब्रू मनाने नाईलाजास्तव सर्वसामान्य मतदारांचे ऐकून घेणे भाग पडते. तेव्हा संविधानाच्या मतदानाची ताकद सर्व मतदारांना तक्रारदारांना कळते ज्या प्रभाग रचना समितीने प्रभाग रचना गठीत केली त्या प्रभाग रचनेनुसार मतदार याद्या बनवल्या ती समिती अन्यसाधारण आंतरराष्ट्रीय नशा करून बेहोषित ही प्रभाग रचना व मतदार याद्या प्रभाग रचनेनुसार बनवल्या आणि त्यांच्या अकलीच्या अब्रूची दिंडोरे आमराई विभागातील मागासवर्गीय झोपडपट्टीतील तरुण कार्यकर्त्यांनी ढोल वाजून गावभर काढले. अशा प्रशासनाला निवडणूक प्रभाग रचना व मतदार याद्या तयार करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मतदारांसमोर खाली मान घालण्याची वेळ आज प्रशासनावर आली आहे. प्रत्येक मतदाराचे त्यांचा पूर्ण पत्ता व निवास तसेच त्यांचे निवासी व मतदाता पुरावे सादर करून फेर मतदार याद्या तयार करण्यासंबंधी सूचना व दुरुस्त्या करण्याबाबतचे आदेश प्रांत अधिकारी बारामती उपविभाग यांनी दिले आहे.

Advertisemen

आमराई तील जागृक मतदार व युवक कार्यकर्त्यांनी कायदा व बुद्धीच्या जोरावर निवडणूक निर्णय अधिकारी प्रभाग प्रारूप रचना अधिकारी मतदार नोंदणी अधिकारी यांना फेर चौकशी करून दुरुस्त करण्याबाबतच्या सूचना प्रांताधिकारी यांनी दिले आहे. पुढील कार्यवाही व दुरुस्ती व चौकशी “देवा” भाऊंच्या हातात असल्याचे आक्षेप घेणाऱ्या उपस्थित असलेल्या नेत्या उपनेत्या यांनी सांगितले आहे. उद्याच्या आक्षेप सुनावणी बाबत
क्रमशः


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »