बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती नोकर भरती गौडबंगाल?
बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादाजी पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चालत असून अत्यंत विकसित अशीही कृषी उत्पन्न बाजार समिती आहे अशी ख्याती महाराष्ट्रभर पसरवली जात असून या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जुन्या व नव्याने नोकर भरती करण्यासंबंधी जाहिरात प्रसिद्ध झाली असून या जाहिरातीच्या माध्यमातून अनेक इच्छुक उमेदवारांनी संबंधित जागेसाठी आपले अर्ज भरण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गर्दी केली आहे. परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीने या उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यासाठी कुठेही कसलीही सोय केलेली नाही. त्यामुळे या भरती संबंधित परिसरात उलट सुलट चर्चा चालू आहे.
संबंधित जागेवरती अगोदरच नोकर भरती झाल्याचे अनेक व्यापारी व कर्मचारी बोलत आहेत. नोकर भरती नंतर सदरच्या नोकर भरतीची परवानगी समितीने वरिष्ठांकडे मागितली असून त्यास मान्यता मिळाल्याचे समजते. यापूर्वी अनेकदा या भरत्या कशा पद्धतीने केल्या जातात याबद्दल अत्यंत मजेदार, सुरस, अर्थपूर्ण कथा सांगितल्या जात आहेत. तालुक्या बाहेरच्या अनेक उमेदवारांना मुलाखतीच्या अगोदरच जागा निश्चिती झाल्याच्या मोबाईलवरून संदेश पाठवल्याची घटनाही घडलेली आहे. त्याचप्रमाणे एकाच गावातील पंधरा-पंधरा कर्मचारी देवान घेवानेतुन भरती केल्याची कादंबरी प्रसिद्ध असून प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहे.
याबाबत माननीय अजितदादा पवार यांच्याकडे याबाबत अनेकदा हेवे दावे झाल्याचे समजते. त्यामुळे नव्याने होऊ घातलेली भरती एक फास असून उमेदवारांना इच्छुकांना मानसिक व शारीरिक छळ करण्याचा हा प्रकार असल्याचे आम्ही अनेक उमेदवारांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाच्या परिसरात आमच्या प्रतिनिधींना सांगितले. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेवक भरतीत काय चाललंय याबाबत कृषी उत्पन्न समितीमध्ये उलट सुलट चर्चा चालू आहे. याबाबत कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य सचिव अरविंद जगताप व सभापती विश्वास आटोळे हे नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे या चर्चेला अजूनच माल मसाला लावून चर्चेचा वेग वाढत आहे. याबाबत माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर काही उमेदवार उद्या अजित दादांना भेटून यासंबंधी तक्रार करणारा असून तसेच सहकार आयुक्तांकडे आंदोलनाचा इशारा देण्याच्या तयारीत आहेत.
या भरतीमध्ये संचालक मंडळांच्या नातेवाईकांना सेवक म्हणून घेतले नसल्याने आणि त्यांना या भरतीबाबत कुठेही विश्वासात घेतले नसल्यामुळे संचालक मंडळ याबाबत अजित दादा पवार यांना संपूर्ण माहिती देणार आहे. तर ही भरती बेकायदेशीर असून रोस्टर पद्धतीने भरती केलेली नाही आणि अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर काही लोक कोर्टात जाणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रोस्टर मेंटन केले जात नाही, त्यामुळे तीव्र भावना निर्माण झाली आहे तर याविरुद्ध बारामती कृषी उत्पन्न बाजार समिती समोर आंदोलन करण्याचा इशारा काही दलित संघटनांनी दिलेला आहे त्यामुळे ही सेवा भरती होते की नाही याबद्दल शंका निर्माण.