उद्योग व्यवसाय करताना अभ्यास करूनच व्यवसायात उतरा; भीमथडीचे व्यासपीठ म्हणजे ट्रेनिंग सेंटर – सुनंदा पवार


बारामती : धडपड करणाऱ्या महिलांना निसर्गाची व नशिबाची साथ नेहमीच मिळत असते. महिला बचत गटांनी झटपट यशस्वी होण्याच्या नादी न लागता कष्ट, जिद्द, सचोटी, प्रामाणिक पणा व मालाची गुणवत्ता राखल्यास ग्राहक आवडीने तुमच्या वस्तू खरेदी करील असे स्पष्ट मत सुनंदा पवार यांनी अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती संचलित, शारदा महिला संघाच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. भीमथडी जत्रा २०२५ मध्ये विविध स्टॉलच्या माध्यमातून उत्तम व्यवसाय करणाऱ्या महिलांचे भिमथडीतील अनुभव कथन व बचत गटांना कर्ज वितरण या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून छत्रपती संभाजीनगरच्या श्री स्वामी समर्थ महिला गृह उद्योगाच्या प्रमुख मा. सौ. कालिंदीताई प्रवीण जाधव यांनी उपस्थित महिलांना मागर्दर्शन केले. ग्राहक पुन्हा पुन्हा तुमच्याकडे येतील असेच उत्पादन महिलांनी बनवावे असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांचा ५ किलो पासून सुरु केलेला व्यवसाय आज प्रतिदिन २०० किलोपर्यंत जाण्याचा प्रवास त्यांनी कथन केला. सौ कालिंदीताई या ८ एकर ओवाची शेती करत असून त्यालाही मोठी बाजारपेठ त्यांनी स्वकष्टातून निर्माण केली आहे. गटातील इतर महिलांना बरोबर घेऊनच गटाची व पर्यायाने महिलांची प्रगती होत असते. मार्केटिंग मध्ये गुणवत्ता, पॅकिंग व ब्रँडिंग महत्वाचे असते त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड करू नका.
या प्रसंगी सोलापूरच्या श्री महालक्ष्मी पापड उद्योग समूहाचे अध्यक्ष मा. श्री राजेश डोंगरे यांनी ४ महिलांना घेऊन सरू केलेला पापड व्यवसाय आज ६४०० महिलांना रोजगार देत असल्याचे सांगितले. पापड उद्योगात गुणवत्ता राखल्यानेच दरमहा जवळपास ७ कोटी रुची उलाढाल होत असल्याचे सांगितले. दरम्यान सुनंदा पवार पुढे बोलताना म्हणाल्या की भीमथडी जत्रेच्या अनुभव कथनातून बोललेल्या प्रत्येक महिलेचा अनुभव काही ना काही शिकवूनच गेला. शारदा महिला संघाच्या माध्यामतून आजपर्यंत जवळपास ७ कोटी रुचे कर्ज वितरण केले असून महिला संघाला जोडलेल्या महिला या कर्जाची नियमितपणे परफेड करत आहेत. गटातील सर्व महिलांनी एकत्र येवून व्यवसाय केल्यास आपापसातील सलोखा वाढतो व विनाकारण चालणारे गॉसिप्स आपोआप थांबेल. उद्योग व्यावसाय सुरु करताना पूर्ण माहिती घेऊन, सर्वे करूनच व्यवसायात उतरा व ग्राहकांचा चेहरा वाचा आणि त्यांचा आदर करा. भीमथडीचे व्यासपीठ याकडे एक प्रशिक्षण केंद म्हणूनच पहा. शहरातील महिला नोकरी व्यवसाय करत असल्याने त्यांचेकडे विविध पदार्थ बनविण्यसाठी वेळ नाही, त्यामुळे दर्जेदार उत्पादने तयार करून शहरी ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्याची तयारी महिलांनी ठेवावी. महिलांनी केवळ भीमथडीवर समाधान न मानता रेस्टॉरंट सारखा मोठा व्यवसाय सुरु करत असल्यास संस्था पाठबळ देण्यास तयार असल्याचे सांगितले.
या प्रसंगी मा. सईताई पवार, सचिन खलाटे यांचेसह मनाली कोकरे, वैशाली बोडरे, स्मिता गायकवाड, पूनम धुमाळ, प्रियांका निंबाळकर, पूजा रसाळ, स्मिता ओहोळ, वैशाली बागल, नीता अव्हाडे, नेहा कदम, अनिता ताकवले, सुप्रिया हरिहर, कविता यादव, ज्योती लंबाते, श्रद्धा लोखंडे, वर्षा निंबाळकर, वर्षा शिंदे, मनीषा फडतरे, कीर्ती थोरात, शीतल चालेकर, सीमा आळेकर, सौ. जामदारताई, पुष्पा निंबाळकर आदी महिलांनी आपले मनोगत व्यक्त करताना भिमथडीतील आपले अनुभव व व्यवसायाची उलाढाल मनोगतातून व्यक्त केली. भीमथडी व मा. सुनंदाताई यांच्यामुळेच घराबाहेर पडून व्यवसाय करू शकलो अशी कृतज्ञतेची भावना या सर्व महिलांनी व्यक्त केली. आपल्या प्रास्ताविकात मा. बाळासाहेब नगरे यांनी शारदा महिला संघाचा संक्षिप्त आढावा सदर केला. या कार्यक्रमाला संस्थेच्या मनुष्यबळ विभागाच्या प्रमुख मा गार्गी दत्त यासह महिला बचत गटाच्या सुमारे ९०० महिला उपस्थित होत्या.

Advertisemen


या प्रसंगी बारामती, इंदापूर व पुरंदर तालुक्यातील १४ बचत गटांना २५ लाख ५० हजार रु.चे विविध व्यवसायासाठी कर्ज वितरण करण्यात आले. कार्यक्रम यशस्वी करण्यासठी शारदा महिला संघाच्या श्री बाळासाहेब नगरे, प्रकाश साळुंखे, अभिषेक जगताप, तात्यासो शेलार, गजानन मोकाशी, विजय दिवटे, रमेश जगदाळे, निकिता महामुनी, स्नेहल मसगुडे, सीमा पानसरे, शीतल शिर्के, मंदाकिनी बोडके आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्री अरुण पुरी यांनी तर आभार श्री प्रकाश साळुंखे यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »