संपादकीय: आयुष्याच्या संध्याकाळी साहेब!


साहेब.. तुमचं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, बहुआयामी व्यक्तिमत्व त्या प्रत्येक क्षेत्रात जेवढे दिवस तुम्ही कार्यरत आहात तेवढे माझे वयही नाही आणि आयुष्यही नाही आकाशाला गवसणी घालणारे आपले व्यक्तिमत्व चिरायू व्हावो हीच प्रार्थना…

आज तुमच्या बहुआयामी आयुष्याबद्दल चार शब्द लिहावेत एवढा माझा तुमच्याबद्दल अभ्यासही नाही आणि तुमच्या मी सहवासात ही नाही तुमच्या मूळ कर्मभूमीतला मी एक लहानगा तुमचा मतदार आहे तुमच्याबद्दल वयोवृद्ध लोकांना कडून जे ऐकलं चार विचारवंतांचे पुस्तक, लेख चरित्र वाचले एवढंच माझं तुमच्याबद्दल अल्पस ज्ञान..

जेव्हा एखादी सामाजिक शैक्षणिक संस्था वयोवृद्ध होते तेव्हा तिच्या असंख्य शाखा मूळ शाखेचे रूप परिधान करून गावोगावी, राज्योराजी, देशोदेशी आपले रूप प्रकट करून विस्तारित होतात हा नैसर्गिक नियम सर्वच संस्थांना लागू होते परंतु दुर्दैवाने तुमची वैचारिक संस्था पूर्ण महाराष्ट्रात आपली बीज अंकुरू शकली नाहीत असं माझं प्रामाणिक मत आहे तुम्ही ज्या ज्या विविध क्षेत्रातील संस्था तुमच्या विचाराने नवनिर्माण केल्या किंवा दुसऱ्याच्या अंगीकृत केल्या त्या संस्थांची वाढ खुंटली असल्याचे दुर्दैवाने म्हणावे लागेल पण तुमच्या रक्ताच्या कुटुंबाच्या सर्वांगीण संस्था या त्या त्या कार्यक्षेत्रात फुलल्या फळल्या ज्यांनी सावली दिली मधुर फळही दिली आणि सुगंधही दिला

तुम्ही भारतीय राजकारणातले चाणक्य म्हणून सुप्रसिद्ध पावला आहात पण तुम्ही महाराष्ट्रात कधीही एक हाती सत्ता आणल्याचे आमच्या वाचनातही नाही आणि ऐकण्यातही नाही भारतीय राजकारणाच्या दुर्दैवाने तुमच्या नंतर राजकारणात आलेले केजरीवाल, अखिलेश यादव, जगमोहन रेड्डी, ममता बॅनर्जी यांच्यासारखे तरुणांचे असंख्य नावं घेता येतील ज्यांनी आपापल्या राज्यात आपल्या स्वतःच्या स्वबळावर सत्ता आणली आहे मग आपण हे का करू शकला नाहीत याबद्दल आम्हा तरुणांच्या मनात आपल्या कार्यक्षमतेबद्दल शंका निर्माण होते हे आमचे सगळ्यात मोठे दुर्दैव

Advertisemen

आपल्या तहयात राजकारणात समाजकारणात अर्थकारणात सांस्कृतिकारणात आपले निष्ठावंत शिष्यगण हे नेहमीच आपल्याला सोडून गेल्याचे आम्ही वाचले आहे आणि आजही अनुभवत आहोत आपली माणसं ओळखण्याची व त्यांना त्या त्या क्षेत्रात मोठे करण्याची जी क्षमता आहे ती तुम्हाला माणसं ओळखता येत नाही का? असा विचार आमच्या मनात येतो

साहेब या वयात ही कॅन्सरवर मात करून तुम्ही तरुणांना लाजवेल असं तुमचे शारीरिक व मानसिक कार्यक्षमता वाखरण्यासारखी आहे परंतु मौके पे चौका मारण्याची तुमची प्रवृत्ती व वकब तुमच्या एकही शिष्यांमध्ये आजपर्यंत दिसलेली नाही हे महाराष्ट्राच्या राजकारणासाठी अत्यंत दुर्दैवी आहे तुमच्या शारीरिक क्षमतेबद्दल आम्ही कधीही शंका घेतली नाही आणि घेणारही नाही परंतु तुमच्या या क्षमतेचा वापर राज्य व राष्ट्रीय विकासासाठी झाला की नाही आणि होणार आहे की नाही याबद्दल माझे अपुरे ज्ञान आहे त्याबद्दल मी काहीही बोलणार नाही आणि लिहिणारही नाही या आयुष्याच्या संध्याकाळी तुमच्या वयाचे अनेक धुरंधर राजकारणी समाजकारणी अर्थकारणी कृषीतज्ञ यांनी संन्यास घेऊन मार्गदर्शकाच्या भूमिकेत आज आनंदाने आयुष्य कंठत आहेत ना सत्तेची लालसा ना अधिकाराची लालसा ना अर्थकारणाचे लालसा अशा कौटुंबिक अवस्थेत जीवन आनंदाने कंठीत आहेत पण साहेब आपण मात्र आज ही जगासमोर आदर्श व्रत आहात आज ही सर्व शक्तीनिशी सर्व संस्थांवरील पकड कायम ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहात त्याबद्दल तुमचे करावे तेवढे स्तुती कमीच आहे जागतिक शब्दकोशातील शब्द अपुरे पडतील एवढी स्तुती तुमची करता येईल

तुमच्या विचाराचे बीज या महाराष्ट्रात कुठेतरी अंकुरावे व त्याचा वटवृक्ष व्हावा आणि त्याने भारतालाच नव्हे तर जगाला गवसणी घालावी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तरुणांना संधी तरुणांना संधी असा तुमचं सर्वांगिण रूप घेतलेला एखादा तरुण रक्ताचा तरणाबांड शंभर टक्के तुमच्या विचारांचा नवीन शरदचंद्रजी गोविंदराव पवार या युगात पुनश्च प्रकट व्हावा आणि माझ्या हयातीत मला भेटावा हीच तुमच्याकडून छोटीशी अपेक्षा तुम्ही ती माझा तरुण हट्ट म्हणून पूर्ण करावा हाच आग्रह धरून पुन्हा शब्द रूपाने तुम्हाला मी भेटेनच
जय हिंद जय भारत


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »