खेळाचं मैदान हरवलय !
बारामती शहरातील खेळाचे मैदान हरवण्याची तक्रार क्रिकेटपटूंनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार अजित दादा पवार यांच्याकडे केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हे बंदीस्त झाले असून त्यावर क्रिकेट खेळण्यास मज्जाव आहे. तर बारामतीतील 29 खुल्या जागेत नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे त्यावर अतिक्रमणे झाले असून बालगोपाल व तरुणाना खेळव्यासाठी मैदान शिल्लक राहिलं नाही. त्यामुळे बालगोपाल व खेळाडू वनवन मैदान हुडकत गावा बाहेर फिरत आहेत. बारामतीचा सर्वांगीण विकास होत असताना बाह्य खेळ सांस्कृती लोभ पावत आहे. याची खंत अनेक जेष्ठ खेळाडूंनी व्यक्त केली आहे. कसब्यातील मुथा, शहा यांच्या खाजगी मैदानावर आता पोलिस गस्त घालत आहेत. क्रिकेटच्या स्पर्धा रद्द होत आहेत. कबड्डी, हॉलीबॉल, फुटबॉल, खो-खो, हे खेळ तर बारामती शहरा मधून हद्द पार झाले आहेत. आता गल्ली बोळातील क्रिकेट ही हद्दपार होणार आहे. मैदानी खेळ संस्कृती बारामतीतून हद्दपार होत असताना राजकीय व सामाजिक कार्यकर्ते याकडे हेतु पुरस्पर दुर्लक्ष करत आहेत. बारामती शहरातील छोटी मोठी मैदाने खुल्या जागा वरिल अतिक्रमण काढून देण्यासाठी बालगोपाल व तरुण खेळाडू मोठे आंदोलन उभे करणार आहेत. यासाठी पालकांमध्ये जनजागृती करण्यासाठी करण्यासाठी मुलांना शारीरिक व मानसिक आरोग्य समृद्ध होण्यासाठी बारामती शहरामध्ये खुली मैदाने असणे काळाची गरज आहे. बारामतीचा विकास होताना यांचाही विचार केला गेला पाहिजे अन्यथा बकाल बारामती झाल्याशिवाय राहणार नाही.
क्रिकेट खेळायचे असेल तर फक्त लेदर बॉलवरच खेळावं लागेल असे तोंडी सांगून एक प्रकारे बारामतीकरांवर अन्यायकारक निर्णय लादण्याचे पाप स्टेडियम ज्यांच्या कडे भाडेतत्त्वावर चालवण्यासाठी दिले आहे त्यांच्या कडून हुकूमशाही पद्धतीने केले जाते आहे जे की पूर्णपणे चुकीच आहे . स्थानिक खेळाडूंच्या हक्क आणि अधिकारासाठी यापूर्वी देखील रिपाइं (आठवले) पक्षामार्फत तीन वेळा आंदोलने करण्यात आली ज्यामुळे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम हे स्थानिकांना टेनिस बॉल वरील क्रिकेट खेळासाठी खुल देखील करण्यात आले होते. येणाऱ्या काळात देखील वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन रिपाइं (आठवले) पक्षमार्फत करण्यात येणार असल्याचे मा. रविंद्र (पप्पू) सोनवणे आणि अभिजित कांबळे यांनी सांगितले.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्टेडियमवर टेनिस बॉल वरील क्रिकेट खेळण्यास मज्जाव करण्यात आला आहे का?याबाबत बारामती नगर परिषदेचे मुख्याधिकारी मा.महेशजी रोकडे तसेच सबंधित स्टेडियमचे ठेकेदार मा.धीरज जाधव यांच्या प्रतिक्रिया विचारली असता याविषयी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.