इंटरक्लब महाराष्ट्र राज्यस्तरीय जलतरण स्पर्धेत शारदानगरच्या जलतरणपटूंची नेत्रदीपक कामगिरी


बारामती : शारदनगर येथे द्रोणाचार्य स्पोर्ट्स असोसिएशन पुणे यांच्या माध्यमातून व महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या मान्यतेने दिनांक २३ व २४ ऑगस्ट २०२५ रोजी शारदानगर येथील जलतरण तलावावर खुल्या जलतरण स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेला विविध वयोगट व विविध स्विमिंग प्रकारात महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, छ. संभाजीनगर, अमरावती, सोलापूर यांसह एकूण १८ जिल्ह्यातील विविध वयोगटातील जवळपास २०० स्पर्धकांनी विविध स्विमिंग प्रकारात भाग घेवून आपले कौशल्या आजमावले. या स्पर्धेत शारदानगर जलतरण तलावात सराव करणाऱ्या विविध वयोगटातील ३१ मुलांनी भाग घेताला व खालील प्रमाणे यश संपादन केले आहे.

६ वर्षाखालील मुले :

१. राजवीर विक्रम पवार:– ५० मी. किक बोर्ड – तृतीय क्रमांक

१४ वर्षाखालील मुली:-

१. महती पाटील:- २०० मि फ्री स्टाईल – प्रथम क्रमांक, २००मि आय. एम. – द्वितीय क्रमांक, १०० मी फ्री स्टाईल द्वितीय क्रमांक, ५० मी फ्री स्टाईल – तृतीय क्रमांक,

२. धृविका गोसावी:- ५० मि बॅक स्ट्रोक प्रथम क्रमांक, १०० मि बॅक स्ट्रोक द्वितीय क्रमांक.

३.सिद्धी खोमणे:- ५० मि ब्रेस्ट स्ट्रोक द्वितीय क्रमांक.

१७ वर्षाखालील मुली:-

१.श्रेया साळुंखे:– ५० मि बॅक स्ट्रोक प्रथम क्रमांक, ५० मि फ्री स्टाईल प्रथम क्रमांक, २०० मी आय. एम. प्रथम क्रमांक, १०० मी बॅक स्ट्रोक द्वितीय क्रमांक, २०० मी फ्री स्टाईल द्वितीय क्रमांक.

Advertisemen

२. अरुंधती सोनावणे:- १०० मी फ्री स्टाईल द्वितीय क्रमांक, २००मि फ्री स्टाईल तृतीय क्रमांक, ५० मि फ्री स्टाईल तृतीय क्रमांक, १०० मि बॅक स्ट्रोक तृतीय क्रमांक, २०० मी आय एम तृतीय क्रमांक.

३. स्वप्नप्रीती कोठावळे:- २०० मि आय एम – द्वितीय क्रमांक, १०० मी ब्रेस्ट स्ट्रोक द्वितीय क्रमांक,

४. राधिका तावरे:- ५० मि बॅक स्ट्रोक द्वितीय क्रमांक, १०० मि बॅक स्ट्रोक द्वितीय क्रमांक.

५. मंजिरी घोडके:- १०० मी फ्री स्टाईल – तृतीय क्रमांक

१७ वर्षाखालील मुले:-

१. मानव तावरे:- ५० मी ब्रेस्ट स्ट्रोक द्वितीय क्रमांक, ५० मी बटरफ्लाय तृतीय क्रमांक.

खुला गट

१.प्रतिक अंधारे:- ५० मि बॅक स्ट्रोक द्वितीय क्रमांक, १०० मि ब्रेस्ट स्ट्रोक तृतीय क्रमांक.

२. निनाद फरांदे:- १०० मि ब्रेस्ट स्ट्रोक द्वितीय क्रमांक.

सर्व यशस्वी स्पर्धकांना संस्थेच्या वतीने चेअरमन मा. राजेंद्र दादा पवार, विश्वस्त मा. सौ. सुनंदाताई पवार, सी इ ओ मा. निलेश नलावडे, मानव संसाधन विभागप्रमुख मा. गार्गी दत्ता , समन्वयक श्री प्रशांत तनपुरे, विविध विभागांचे प्रमुख आदींनी पुढील वाटचालीस शुभेच्छा देवून अभिनंदन केले. वरील सर्व विजेत्या स्पर्धकांना श्री महादेव तावरे व श्री सुभाष बर्गे यांनी कोच म्हणून काम पाहिले आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »