सुपा पोलिसांचा चांदगुडेवाडीतील जुगार अड्ड्यावर छापा; चौघांवर गुन्हा


बारामती : चांदगुडेवाडी (ता. बारामती) येथील रोहन बिअर बारच्या पाठीमागे पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर सुपा पोलिसांनी छापा टाकून चौघांवर गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे परिसरातील अवैध जुगार अड्ड्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

२२ ऑगस्ट रोजी दुपारी सव्वातीनच्या सुमारास चांदगुडेवाडी परिसरात काहीजण पैसे लावून बेकायदेशीरपणे जुगार खेळत असल्याची माहिती सुपा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन घटनास्थळी धाव घेतली. दुपारी सुमारे ३.४५ वाजता रोहन बिअर बारच्या पाठीमागील मोकळ्या जागेतील पत्र्याच्या शेडवर अचानक छापा टाकण्यात आला.

Advertisemen

यावेळी दिगंबर दत्तात्रय जाधव (३७), संतोष बबन चव्हाण (४७), गौरव संजय पोमणे (२०) आणि अमित धनजय जगताप (३०) हे पैसे लावून तीन पानी पत्त्यांचा जुगार खेळताना आढळून आले. पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेतले.

पोलिसांनी कारवाईदरम्यान १ हजार ७५० रुपये रोख रक्कम आणि ५२ पानी पत्त्यांचा संच जप्त केला. पंचांसमक्ष जप्तीची कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल पियुष शिवाजी माळी यांनी फिर्याद दिली असून, महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, १८८७ मधील कलम १२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रुपेश दिनानाथ साळुंखे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »